“बगल”

बगल(क) खाक; खांद्याखालचा भाग. 
 (ख) आंगरखा, बंडी, वगैरेंच्या बाहीला जो चौकोनी तुकडा शिवलेला असतो तो. बायकांच्या चोळीला असाच तुकडा असतो तो त्रिकोणाकृति असतो, आणि त्याला कोर असें म्हणतात. (कोर स्त्रीलिंगी). 
 (ग) लंगड्या मनुष्याची कुबडी. 
 (घ) बाजू. 
एकादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करून येणेंती वस्तु आपल्या खिजगणतींत नाहीं असें धरून वागणें. 
एकादी वस्तु बगलेंत मारणेंछाती आणि बाहु यांच्यामध्यें ती दाबून धरणें; खाकोटीला मारणें. 
एकाद्याच्या बगलेंत असणेंत्याच्या संरक्षणाखालीं असणें; त्याच्या वशील्याचा असणें; त्याचा अंकित असणें.उ० जो कोणा तरी थोर माणसाच्या बगलेंत असेल, त्याला सारे लोक नमून असतात.
तें काम त्याच्या बगलेंतलें आहेतें त्याला सहज करता येण्याजोगें आहे. 
बगल, किं० बगला, वर करणेंआपल्याजवळ कांहीं नाहीं, किं० कोणी शोधीत असलेली विशिष्ट वस्तु नाहीं, असें सिद्ध करण्यासाठीं बाहु वर करून दाखविणें; आपणाजवळ कांहीं नाहीं असें म्हणणें. 
बगलेंतून एकादी गोष्ट काढणेंएकादी खोटी गोष्ट बनवून ती खरी म्हणून सांगणें; बात झोंकणें. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!