आरती तुळसीची | Tulasi Aarati

वृंदावनभुवनी तुळसीचें वन ।
क्रीडा करी स्वयें श्रीकृष्ण रात्रंदिस तुळसीचें ध्यान ।
सत्यभामा नारी करिते पुजन ॥१॥

जयदेवी जयदेवी जय तुळसी सुंदरी ।
अखंड विष्णु तुज निजमस्तकी धरी ॥ध्रु०॥

सहज सांवळा कृष्ण हा बरवा ।
कंठों शोमती तुळसीच्या माळा ।
वृंदावनभुवनी गोपिका सकळा ।
तुळसीपूजन करिती बाळा वेल्हाळा ॥२॥

कार्तिक मासी तुळसीची भाक्त ।
राधादामोदर बूंदावनी येती ।
शंख चक्र गदा पनें काढिती ।
लावुनि उत्तम दीप पंचारति करिती ॥३॥

उठोनियां प्रातःकाळी करिती स्मरण ।
श्रीकृष्णहृदयीं तुळसीचें ध्यान ।
त्याची भाक्ति करी बहिणी आपण ।
द्यावें प्रेमभावे मज मूढा ज्ञान ॥ ४ ॥

संत बहिणाबाईची गाथा – शंकर नरहर जोशी (संपा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!