“जिव्हा”

जिव्हा(क) जीभ. 
 (ख) अग्नीची ज्वाळा. 
 (ग) जिभेच्या आकाराची कोणतीही वस्तु. 
 (घ) वाचा. बोलण्याची प्रवृत्ति. योग्यायोग्याचा विचार न करतां कांहीं तरी बोलण्याची प्रवृत्ति. 
 (ङ) खाण्याची लालसा, खाद्य पदार्थांत आवडनिवड करण्याचा स्वभाव; चोखंदळेपणा. 
जिव्हा वाकडी पडणें(क) अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणे, किं० न हालेशी होंणें. 
 (ख) न बोलावयाची गोष्ट गैरसावधपणें बोलून जाणें. 
जिव्हा विटाळणें (क) जीभ अपवित्र करणें (शिव्या देऊन, किं० खोटें बोलून) 
 (ख) नालायख मनुष्यासाठीं रदबदली करणें, किं० त्याची शिफारस  करणें. 
जिव्हा हातीं धरणें(क) शिव्या देत सुटणें. 
 (ख) खाण्याचे चोचले करणें; आधाशासारखे खाणें. 
 जिव्हेला आढावेढा असणेंभाषणाची नियंत्रणा असणें; बोलावयाला हरकत असणें. उ० हें काय तुम्ही भलभलतें बोलतां ? जिव्हेला कांहींतरी आढावेढा असूं द्या ! (म्ह० जिभेला आळा घाला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!