“दांत”

दांत.(क) चर्वणक्रियेच्या उपयोगीं पडणारे जे तोंडांतील अस्थिविशेष ते प्रत्येक. 
 (ख) फणीचा, करवतीचा, चक्राचा, नांगराचा, डंगाचा, वगैरे दांत. 
त्याचा माझ्यावर दांत आहेमाझ्यावर त्याचा रोष आहे. तो माझा द्वेष करतो. मजविषयीं त्याच्या मनांत वैरबुद्धि आहे. 
दांत उठणेंदांतांनीं धरलेल्या पदार्थावर दांतांचीं चिन्हें (म्ह० खळग्या) उठणें.उ० हे पहा मांजराचे दांत माझ्या पोटरीवर उठले आहेत!
दांत काढणें किंवा दाखविणेंआपले दांत दुसऱ्यापुंढे विचकणें.उ० माकडानें दांत काढलेले पाहून मुलांना भीति वाटते.
  उ० त्या म्हाताऱ्याच्या पुढें हीं टारगीं पोरें दांत दाखवीत होतीं!
दांत खाऊन किंवा दांतओठ खाऊनमोठ्या रागानें आणि अवसानानें. 
दांत खाणें किंवा चावणेंदांतावर दांत घासणें (झोपेंत वगैरे).उ० गोविंदपंताला झोपेंत दांत खाण्याची खोडी आहे.
एकाद्याचे दांत त्याच्याच घशांत घालणें, किंवा ज्याचे दांत त्याच्याच घशांत घालणेंत्याची लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजीती करणें. 
दांत झिजणेंनिष्फळ उपदेश करून तोंडाला मेहेनत होणें; केलेली विनंति फुकट गेल्यामुळें तोंडाला व्यर्थ श्रम होणें; शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्याला न समजल्यामुळें तोंडाचे श्रम फुकट जाणें. 
एकाद्यावर दांत धरणेंत्याच्याविषयीं मनांत शत्रुत्व बाळगणें.उ० मी त्या गार्डाविरूद्ध जनरल् ट्राफिक् म्यानेजरकडे तक्रार केल्या दिवसापासून त्या गार्डानें मजवर दांत धरला आहे!
एकाद्याचे दांत पडणेंत्याची फजीती होणें. 
एकाद्याचे दांत पाडणेंत्याची फजीती करणें. 
दांत पाजविणेंएकादी वस्तु, (विशेषतः खाण्याची) वस्तु, मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठित असणें. टीप-हत्यार पाजविणें, म्ह० तें घासून त्याची धार तीक्ष्ण करणें. [डुकर आपले दांत रिकामपणीं झाडाच्या खोडावर घासून ते तीक्ष्ण करीत असतें अशासाठीं कीं खाद्य वस्तु मिळतांच ती चावून तत्क्षणीं खातां यावी. यावरून दांत पाजाविणें म्ह० खाद्य पदार्थांसाठीं आतुर होऊन राहाणें, असा अर्थ झाला.] 
‘एकाद्याचे दांत पाडून हातावर देईन,’ असें म्हणणेंतुझी कंबख्ती, किं० पारिपत्य, करीन, अशी त्याला धमकी देणें. 
दांत वठणेंउच्चारलेला शाप फलद्रूप होणें. 
दांत वासणेंकेलेले श्रम फुकट गेल्यामुळें खिन्न होऊन बसणें. 
दांत वासून पडणें(क) मेहेनत फुकट गेल्यामुळें हिरमुष्टें होऊन बसणें. 
 (ख) आजारानें अशक्त होऊन आंथरुणास खिळून जाणें. 
एकाद्याच्या पुढें दांत विचकणें(क) त्याला वेडावणें. 
 (ख) नादान मनुष्याजवळ याचना करणें.उ० पूर्वीं एकदा मी रामरावाच्या जवळ पैसे उसने मागितले होते. त्याच्याजवळ तेव्हां पैसे असून, नाहीत असें त्यानें मला खोटेंच सांगितलें. आतां पुन्हा मीं त्याच्या पुढें पैशासाठीं दांत विचकणार नाहीं!
दांतओठ खाणें किंवा चावणेंरागानें दातांवर दांत घासणें, किंवा रागामुळें आपले ओठ दांतांनीं चावणें. 
एकाद्याच्या दांताचें विष बाधणेंएकाद्याचे शापोद्गार फलद्रूप होणें. 
दांतांच्या कण्या करणेंएकसारखा उपदेश करीत राहणें. [उपदेश फुकट गेला म्हणजे योजतात]. 
त्याच्या दातांच्या घुगऱ्या झाल्या आहेत(क) त्याचे दांत हालूं लागले आहेत, किंवा खिळखिळे झाले आहेत. 
 (ख) उपदेश, विनवणी, वगैरे करून करून त्यानें आपल्या दांतांस फार शीण दिला आहे. 
त्याच्या दांतांवर मांस नाहींतो दरिद्री आहे; तो असमर्थ, दुर्बल, आहे.उ० त्याच्या दांतावर नाहीं मांस, आणि मोठ्याशीं घालीत असतो गांठ!
दांतीं येणें, किंवा दांतावर येणेंएकाद्या कामांत, किंवा व्यापारांत अपयश, किंवा नुकसानी, येणें. 
दातांस दांत लावून बसणें, निजणें किंवा असणेंउपाशी पोटीं बसणें, निजणें, किं० असणें. 
दांतांओठांवर जेवणेंचोखंदळेपणानें जेवणें. 
दांतीं तृण धरणेंनम्रपणा स्वीकारणें. 
दांतीं बळ धरणेंअतोनात मेहेनत करणें. 
दांतीं येणें(क) रागावणें. 
 (ख) अडचणींत, पेचांत सांपडणें. 
सोन्यानें दांत किसणेंश्रीमंतीचा उपभोग घेणें, श्रीमंत असणें. 
हसतां हसतां एकाद्याचे दांत पाडणेंराग न दाखवितां, न चरफडतां, त्याची फजीती उडावणें, किं० पराभव करणें. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!