ताळू किं० टाळू | | |
| (क) डोक्याचा वरचा भाग. | |
| (ख) मुलाचें जावळ केलें म्हणजे डोक्यावर जो केसांचा झुबका राखून ठेवतात तो. | |
| (ग) तोंडाचा आंतील घुमटाकार भाग. | |
एकाद्याच्या ताळूवर मिरीं वाटणें | (क) त्याला टपका देणें. | |
| (ख) त्याच्यावर पूर्ण अंमल गाजविणें; एकाद्याच्या वरचढ होणें. [डोक्यावर असेंही म्हणतात.] | |
ताळूला, किं० ताळवेस, किं० टाळ्यास, टिपरूं न लागूं देणें | (क) न खळतां रडत राहाणें. | उ० काय मूल तरी तें | मघापासून रडतें आहे ! टाळ्यास टिपरू लागू देत नाहीं ! |
| (ख) एकसारखें बोलत सुटणें. | |
| (ग) एकाद्या गोष्टीचा सुगावा किंवा पत्ता न लागूं देणें. | |
| (घ) एकादी कामगिरी अंगाबाहेर टाकणें. | |
ताळूचा दांत | आवडती किं० प्यारी वस्तु, किं० मनुष्य. | उ० रामूची कोणी निंदा केलेली मला खपावयाची नाहीं ! तो माझ्या ताळूचा दांत आहे ! |
| | टीप- सापाच्या तोंडांतील वरचा दांत, ज्यांत त्याचें विष साठलेलें असतें । आणि ज्याला तो आपले संरक्षणाचें साधन म्हणून जपत असतो असें समजतात,तो त्याचा ताळूचा दांत. |
ताळू भरणें (” भरणें ” सकर्मक) | लहान मुलाला न्हाऊ घालतांना त्याच्या ताळूंत तेल जिरविणें. | |
ताळू भरणें (” भरणे ” अकर्मक) | ताळूचा भाग पूर्णपणें वाढणें, किं० टणक होणें. | उ० ह्या मुलाची ताळू अजून भरली नाहीं, त्याच्या डोक्याला हात लावूं नको. |
एकाद्याच्या ताळूवर किं० ताळवेवरून हात फिरविणें | त्याला फसविणे. | उ० रंगोपंत प्रामणिक मनुष्य आहे असें समजून त्याच्या हातीं मी आपला सर्व कारभार दिला, पण अखेरीस त्यानें माझ्या ताळवेवरून चांगलाच हात फिरविला ! |