आरती श्रीकृष्णाची.

जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा । देवकीसुत नामोचित यादवकुलगात्रा ॥ध्रु०॥ लौकिक वचने वदती श्रीपति हा येउनी। द्वारे जन्मत अरयुत देखियला नयनीं। परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी । जाणति सज्जन विरहित जन्मांतर योनी। अंबरुषीच्या गर्भालागुनि अवतारी । बळिरामचि हा झाला रोहिणिच्या उदरीं । तूं तंव योनीसंभव न होसी निर्धारीं । धन्य तव रूप

पुढे वाचा