“पाऊल”

पाऊल(क) पायाच्या घोट्याखालचा भाग.उ० फार फार चालून माझीं पावलें लटकीं पडूं लागलीं.
 (ख) पायाच्या घोट्याखालच्या भागाची ठेवण, ढब, किं० आकारमान.उ० माझ्या पावलाला बरोबर असा जोडा बांधून आण.
 (ग) पायाचा तळवा.उ० ऐशिया दुःखें चालतां पंथीं । सुकुमार पाउलें पोळतीं॥
फोड उठोनि उले कांती । नखें निघतीं बोटींचीं॥
                                     मुक्तेश्वर, –हरिश्चंद्र
 (घ) पायाच्या तळव्याचा जमीनीवर उठलेला ठसा, किं० आकृति.उ० पावलें निरखून मीं चोर हुडकून काढले.
 (ङ) चालण्याचा वेग.उ० रामाचें पाऊल गोदीच्या पेक्षां सावकाश आहे.
 (च) पायाच्या लांबीइतकी लांबी.उ० सगळ्यांचीं पावलें हत्तीच्या पावलांत.
 (छ) चालण्याची तऱ्हा किं० ढब; विशिष्ट प्रकारची चाल.उ० आमच्या तट्टाला तुर्की पाऊल चांगलें साधलें.
 (ज) चालतांना जमीनीवरील दोन पावलांमधील अंतर.उ० ह्या खोलीची लांबी १५ पावलें, आणि रुंदी ११ पावलें, आहे.
चांगल्या, (किं० वाईट), मार्गांत पाऊल ठेवणेंचांगल्या, (किं० वाईट प्रकारें), वागणें.उ० भोगील दुःख भारी ठेवील असत्पथांत पाउल तो ।
अवलोकुनि त्याच्या या दुःखाची तीव्रता उपल उलतो ॥
पाऊल ओळखणें, जाणणें, किं० समजणेंएकाद्याचा कल किं० स्वभाव जाणणें. 
पाऊल जपून ठेवणेंकाळजीनें वागणें. 
पाऊल पुढें ठेवणेंएकादें काम पथकरावयाला सिद्ध होणें. 
पाऊल पुढें पडणेंएकाद्या कृत्यांत गति होणें, पुढें जाणें.उ० सभा कोठें भरवावी ह्या संबंधानें तुम्हीं तीन तास आतांपर्यंत वाटाघाट केली; पण कालच्यापेक्षां आज जागेच्या बाबतींत तुमचें पाऊल कांहीं तरी पुढें पडलें आहे काय?
पाऊल माघारें घेणें किं० काढणेंमाघार घेणें; मागें हटणें.उ० प्राण गेला तरी मी पाऊल माघारें घेणार नाहीं !
पाऊलें मोजीत चालणेंसावकाश चालणें.उ० असा काय पावलें मोजीत चालला आहेस? झपझप चाल!
पाऊल वांकडें पडणें, वांकड्या मार्गानें पाऊल पडणेंसत्पथ, नीतिमार्ग, सुटून असत्पथानें, अनीतिमार्गानें, जाणें.उ० माझें कोठें वांकडें पाऊल पडलें तें दाखवून द्या, आणि मग बेलाशक माझा कान उपटा !
एकाद्याच्या पावलावर पाय ठेवून जाणेंत्याचें अनुकरण करणें. 
त्याच पावलींदुसऱ्या कामाकडे न जातां; ताबडतोब; व्यर्थ वेळ न दवडतां.उ० मी विठाईचा निरोप ऐकला, आणि त्याच पावलीं मी इकडे आलों, सरकार !
                             न० चिं० केळकर, –तोतयाचें बंड.
Follow by Email
error: Content is protected !!