शार्क टॅंक | Shark Tank Information Marathi

मित्रांनो आज आपण shark tank या बद्दल जाणून घेणार आहोत. आपण shark tank हे शब्द ऐकले आहेत का ? Shark tank ची खूप चर्चा सुरु आहे. परंतु shark tank म्हणजे काय ? Shark Tank Marathi भाषेत उपलब्ध आहे का? Shark Tank India मध्ये आले आहे का ? Shark Tank काय आहे हे अनेकांना माहिती नसेल. माझा प्रयन्त आहे कि या आर्टिकल मध्ये shark tank या बद्दल जास्तीत जास्त माहिती देऊ शकेल.  चला तर सुरु करूया.

शार्क टॅंक रिऍलिटी टीव्ही शो | Shark Tank Reality TV Show

Shark Tank – शार्क टॅंक हा एक रिऍलिटी टीव्ही शो आहे जो पहिल्यांदा अमेरीकेमध्ये सुरु झाला. या शोचे पहिले प्रक्षेपण दिनांक ऑगस्ट ९, २००९ या दिवशी CNBC TV Network वर झाले. या शो चे प्रोड्युसर्स मार्क कुबान, लोरि ग्रेयनेर, केविन ओलिअरी,  रॉबर्ट हर्जावेक, बार्बरा कॉरकोरन व इत्यादी आहेत.

या शो मध्ये पूर्ण जगातून येणारे नवीन उद्योजक, businessman, entrepreneur आपल्या सध्याच्या  किंवा नवीन बिझनेस आयडिया बद्दल माहिती देतात व तिथे बसलेल्या investors ला हे पटवून देतात कि त्यांचा business किती चांगला आहे आणि त्यांच्या business आयडिया मध्ये इन्वेस्टर्स नी का पैसे गुंतवावे ? इन्व्हेस्ट का करावे…

जर तिथे बसलेल्या इन्व्हेस्टर पैकी कुणाला business आवडला तर तिथेच त्यांचा करार होतो . ज्यामध्ये इन्व्हेस्टर सांगतो कि तो किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहे . त्या बदल्यात त्या इन्व्हेस्टर ला कंपनी मध्ये हिस्सा मिळणार असतो. किती हिस्सा द्यायचा हे सुद्धा तेथे ठरविले जाते. आपण बघितले तर अश्या प्रकारची इन्व्हेस्टर कडून पैसे मिळवण्यासाठी संधी या मंचावर मिळते. या मध्ये दोघांचाही फायदा आहे. ज्या व्यवसायाला पैश्यांची गरज असते त्यांना पैसे मिळतात व ज्यांच्या कडे इन्व्हेस्ट करायला पैसे आहेत त्यांना नवीन कंपनी मध्ये हिस्सा मिळतो.  साहजिकच आहे कि हा शो अमेरिकेत असल्यामुळे त्याचे प्रक्षेपण इंग्लिश मध्ये होते. परंतु भारतामध्ये अनेक हुशार व होतकरू लोक आहेत ज्यांना हि संधी मिळू शकत नव्हती. आपणाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि –

शार्क टॅंक हा मंच भारतात आहे का  ? Is there a shark tank in India?

तर याचे उत्तर आहे – हो. शार्क टॅंक हा मंच भारतात आला आहे. ह्या शो चे पहिले प्रक्षेपण डिसेंबर २०, २०२१ रोजी Sony Entertainment Television वर झाले.  इतक्या कमी काळात हा शो खूप फेमस झाला आहे.  Sony TV च्या म्हणण्यानुसार या शो ला ६२,००० हुन अधिक अर्ज आले होते परंतु शेवटी फक्त १९८ लोकांनाच तेथे आपल्या बिसनेस आयडिया सादर करता येणार आहेत. हा शो सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ९ वाजता @sonytvofficial वर प्रक्षेपित होत असतो.  Shark Tank India शो बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण ह्या TV शो चे इंस्टाग्राम अकाउंट – “Shark Tank India” याला फॉलो करू शकता.

Shark Tank India या शो मध्ये Judge म्हणून कोण काम आहेत? Who are Shark Tank India Judges?

Shark Tank India या शो मध्ये खालील व्यक्ती (खरं म्हणजे मोठे उद्द्योगपती) काम पाहत आहेत.  Shark tank india judge म्हणून काम करणे या व्यक्तींना कठीण जाणार हे निश्चित. त्याचे कारण म्हणजे competition. प्रत्येक आयडिया अतिशय चांगली आहे. Shark tank india judge ला Shark असेही म्हणतात. याचाच अर्थ खालील व्यक्ती Star tank India चे Sharks आहेत.

१. विनिता सिंग (वय- 37 वर्ष, Electrical Engieer, IIT Madras, MBA – IIM Ahmedabad)

२. नमिता थापर (वय- 44 वर्ष, Post Graduate)

३. अशनीर ग्रोव्हर (वय- 39 वर्ष, Graduate, Founder and Managing Director, Bharat Pe)

४. पीयूष बन्सल (वय- 36 वर्ष, Post Graduate,)

५. अमन गुप्ता (वय- 44 वर्ष, Co-founder and Marketing Director, BOAT.BOAT)

६. घझल अलघ (वय- 33 वर्ष, Post Graduate)

७. अनुपम मित्तल (वय- 50 वर्ष, Entrepreneur, Founder & CEO of People Group) 

Shark Tank India खरा शो आहे कि दिखावा ? Is shark Tank India Real or fake?

अनेक लोकांना हा हि प्रश्न पडतो कि शार्क टॅंक इंडिया खरा शो आहे कि दिखावा ? हा शो खरा आहे. त्या शो ची वेबसाईट https://sharktank.sonyliv.com/ आहे. ह्या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करू शकतो. पहिल्या ब्याच चे रेजिस्ट्रेशन June 18 – July 21, 2021. ह्या दरम्यान सुरु होते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी, व्यक्तीचे वय १८ च्या वर पाहिजे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!