“शेंडी” | Meaning of Shendi in Marathi | What is ponytail

“शेंडी” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) डोक्याची हजामत करवून, किंवा जावळ करवून, मध्यें जो केशांचा झुबका राखून ठेवलेला असतो तो; हिंदुत्वाची खूण. हळुं हळुं झडो अहंता, सन्नमनीं वार्द्धकीं जशी शेंडी । केंडूं विवेक विषया, निस्पृह जन वस्तुतें जसा केंडी ॥ —मोरोपंत.” (ख) मोर, कोंबडा, वगैरेंच्या माथ्यावरील मांसल तुरा. (ग) शेंडें नक्षत्राचें शेंपूट. (घ) घोड्याच्या दोन कानांच्या दरम्यान कपाळावर लोंबणारे केश. (ङ) तेल्याची घाणा, उसाचा चरक, वगैरेंच्या लाटावरील फळी, किंवा तक्ता.

  1. शेंडी फुटणें – (क) एकाद्या कामांतून दुसरें एकादें बारीकसें नवीन काम निघणें (ख) एकाद्या मोठ्या खर्चाबरोबर दुसरा एकादा लहानसा खर्च करण्याची जरूरी येणें.
  2. एकाद्याची शेंडी सांपडणें, किं० हातांत येणें – त्याला आपल्या कह्यांत आणण्याचें साधन आपणाला मिळणें. उदा. तुझी शेंडी माझ्या हातांत सांपडली आहे; आतां कोठें जातोस पळून तो पहातों!
  3. एकाद्याची शेंडी गुंतणें – तो आडकलेल्या स्थितींत असणें. उदा. त्याचें हें काम मीं अंगाबाहेर टाकलें असतें, पण सध्यां माझी शेंडी गुंतलेली आहे, म्हणून माझा इलाज नाहीं !
  4. एकाद्याच्या शेंडीस फुलें बांधणें – त्याला नटवून सजवून, त्याची खुशामत करून, त्याचें मन आपल्याला अनुकूल करून घेणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!