“अंग”

अंग – या शब्दाचे अर्थ पुढील प्रमाने आहेत. (क) शरीर, देह. उ० मातीत खेळून तुझे सारें अंग मळून गेलें आहे, चार तपेल्या अंगावर ओतून घेऊन स्वच्छ होऊन ये. (ख) शरीराचा कोणताही अवयव, किं० भाग, किं० इंद्रिय. उ० हात, पाय, वगैरे, ही शरीराची अंगें होत. (ग) बाजू, दिशा, तरफ. उ० माझ्या

पुढे वाचा

“डोळा”

डोळा (क) रंग, रूप, वगैर जाणण्याचें इंद्रिय; नेत्र, नयन.  उ० त्याचे डोळे विशाल आणि पाणीदार आहेत.   (ख) दृष्टि, नजर. उ० तो वक्ता वेदीवर येतांच सर्व प्रेक्षकांचे डोळे त्याच्याकडे लागले.   (ग) छिद्र; लहान भोंक. उ० सुईचा किं० दाभणाचा डोळा.   (घ) मोराच्या पिसाऱ्यावरील डोळ्याच्या आकाराचीं वर्तुळें; चंद्रक.    

पुढे वाचा

“डोकें”

डोकें (क) मस्तक, शिर. उ० घाल डोक्याला पागोटें, आणि चल लवकर माझ्याबरोबर !   (ख) एक व्यक्ति.  उ० घारापुरीची लेणीं पाहावयाचीं असलीं, तर दर डोक्याला चार चार आणे फी द्यावी लागते.     उ० झिजिया कर दर दिंदू डोक्यावर घेतला जात असे.   (ग) पिढी. उ० ह्या गांवांत माझ्यासकट आमच्या

पुढे वाचा

“टाळी”

टाळी (क) एका तळहातावर दुसरा तळहात मारणें; ही मारण्याची क्रिया, किंवा तिजपासून झालेला आवाज.  टीप :–अनुरूप क्रियापदः-वाजविंणे, मारणे, पिटणें, वाजणें. उ०टाळ्या पिटोनि जन तेथ सुरम्य घोष-तेव्हां करी; अमित हो सकलांसि तोष ।वि० वा० भिडे, रा. प., स. ३, श्लो. ६१.   (ख) गायनाच्या सुरावर हातावर हात मारणें.     (ग)

पुढे वाचा

“टाच”

  टाच पायाची खोट   उंच टाच करून वागणें अमंगल, किं० अपवित्र, पदार्थांवर पाऊल न पडावे म्हणून पायाच्या चवड्यावर चालणें.    टाचेचें काळीज (क) जिवाचा कलिदा; प्यारी वस्तु; आवडते माणूस. उ० त्याला तुम्ही वाईट म्हटलेलें मला खपावयाचें नाहीं. तो माझ्या टाचेचें काळीज आहे !   (ख) बायकोचा भाऊ, श्यालक. या

पुढे वाचा

“जीभ”

जीभ (क) प्राण्यांच्या तोंडांतील अवयवविशेष; ज्याच्या योगानें खाद्य पदार्थाची रुचि समजते, व खाद्य पदार्थ चर्वणासाठीं दातांमध्यें किंवा दाढांमध्यें ढकलितां येतो; मानवी प्राण्यांत हा अवयव बोलण्याचेंही एक इंद्रिय असतो. जिव्हा.     (ख) जिभेच्या आकाराचा अवयव, किं० भाग, किं० कोणताही पदार्थ.     (ग) अग्नीची ज्वाळा. टीप- “जीभ” ह्या शब्दाचे बहुतेक

पुढे वाचा

“जिव्हा”

जिव्हा (क) जीभ.     (ख) अग्नीची ज्वाळा.     (ग) जिभेच्या आकाराची कोणतीही वस्तु.     (घ) वाचा. बोलण्याची प्रवृत्ति. योग्यायोग्याचा विचार न करतां कांहीं तरी बोलण्याची प्रवृत्ति.     (ङ) खाण्याची लालसा, खाद्य पदार्थांत आवडनिवड करण्याचा स्वभाव; चोखंदळेपणा.   जिव्हा वाकडी पडणें (क) अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणे, किं०

पुढे वाचा

“छाती”

छाती (क) ऊर, वक्षःस्थल.     (ख) धैर्य, धारिष्ट, निढळ्या छातीचा, किंवा उरफाट्या काळजाचा म्ह०  अतिशय साहसी, धाडसी टीप :“छाती” आणि ” ऊर” त्या शब्दांचे बरेच वाक्प्रचार सारखे आहेत ते ऊर शब्दाखालीं पहा. त्याशिवाय जे वाक्प्रचार, ते पुढें दिले आहेत. तसेच मागें ले० ९ पहा. छातीचा कोट करणें येईल त्या

पुढे वाचा

“गाल”

गाल मुखाच्या बाजूचे जे दोहींकडील मांसल भाग ते प्रत्येक.  उ० ज्या मुलाच्या गालावर खळग्या आहेत तें मूल मला आवडतें.     उ० ख्रिस्ती धर्माची अशी आज्ञा आहे कीं कोणी एका गालांत मारिलें असतां दुसरा गाल पुढें करावा.      टीपः-“गाल” ह्या शब्दाने बनलेल्या शब्दसंहतीत ” गालफड ‘ हा शब्द विनोदाने,

पुढे वाचा

“गळा”

गळा.       (क) मानेच्या पुढचा भाग; डोकें आणि छाती यांच्या मधला भाग.     (ख) घसा.     (ग) गाण्यांतील आवाजी. उ० त्या गवयाचा गळा मधुर आहे.   (घ) घागरीचा, तांब्याचा, वगैरे गळ्याच्या आकाराचा भाग.   गळा धरणें (क) घशामध्यें विकृति, आजार, वगैरे उत्पन्न होणें. (धरणें अकर्मक). उ०

पुढे वाचा