“ख” पासुन सुरू होणारे मराठीतील वाक्य, त्यांचे अर्थ व म्हणी “

खडा टाकून ठाव पाहाणें – पाण्याची खोली ठोकळ मानानें ठरवावयाची असतां पाण्यांत खडा टाकतात; म्हणजे आवाज, बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावरचीं वर्तुळें, वगैरेंवरून पाण्याची खोली समजते. त्याप्रमाणें एकाद्या माणसाला एकादा साधासा दिसणारा, परंतु खुबीदार, प्रश्न विचारावयाचा, किंवा सहजपणाच्या आविर्भावानें त्याच्यापुढें एकादें विधान करावयाचें, आणि त्यावर त्याचे जे उद्गार निघतात, त्यांवरून त्याच्या मनाचा

पुढे वाचा

“कोरोना कवच” पॉलीसी आता ग्रुप इन्शुरन्स म्हणून सुद्धा मिळणार – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA- आयआरडीएआय) दिली परवानगी – Corona Kavach Policy.

परवडणारी कोरोना व्हायरस विमा पॉलिसी – Cheapest Corona (Covid-19) Policy Insurance Regulatory Development Authority- (इन्शुरन्स रेगुलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ने आता जनरल व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना गट विमा (ग्रुप इन्शुरन्स) म्हणून “कोरोना कवच” पॉलिसी ऑफर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खाजगी व सरकारी कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. आता पर्यंत

पुढे वाचा

लोण बारगळणें म्हणजे काय ?

एकादा नियम उल्लंघिल्यामुळें निरुपयोणें होणें, फुकट जाणें. आट्यापाट्यांच्या खेळांत खालून वर येणारा गडी पाटीवाल्यापाशीं तोंड मागतो, त्या वेळीं वरचे गडी खालीं जातात. अशा रीतीनें खालून येणारे गडी आणि वरून येणारे गडी यांची एका चौकांत गांठ पडणें, याचें नांव “तोंड मिळणें,” किं० “लोण मिळणें.” अशी गांठ न पडतां, म्हणजे वरचा गडी

पुढे वाचा

अवघड मराठी शब्द व त्यांचे अर्थ

अवदसा – [सं० अवदशा]. (क) निकृष्ट, कष्टमय स्थिति; दुर्दैव. (ख) (लाक्षणिक अर्थानें द्वाड, भांडखोर, कजाग, स्त्री.) अक्षता – कुंकवानें तांबडे केलेले तांदूळ. आव – अवसान, उत्साह, धैर्य. उच्छाद – उपद्रव, सतावणूक, गांजणूक. [क्रियापदें, आणणें, देणें, येणें]. कस – [सं० कषाय] सार, पौष्टिक अंश, सत्त्व, सामर्थ्य, शक्ति, जोर. गच्छंती – नाश,

पुढे वाचा

न ऐकलेले 51 मराठी भाषेतील वाक्य व म्हणी ( जुन्या म्हणी )

आयत्या पिठावर रेघा ओढणें – श्रमावांचून मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें. ह्याच अर्थाची म्हण, “आयत्या बिळावर नागोबा बळी. आव घालणें – अवसान दाखविणें; अमुक गोष्ट करावयाला आपण समर्थ आहों, असा डौल मिरविणें; धमकदारीचा देखावा करून एकाद्या गोष्टीला उपक्रम करणें. आढी, किंवा अढी, धरणें – मनांत वैरभाव गुप्तपणें जागृत ठेवणें. रुसवा किंवा

पुढे वाचा

25 जुन्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

अवदसा आठवणें – निकृष्ट स्थिति, दारिद्र्य, अवनति, किंवा दुःख, प्राप्त होईल, असें वर्तन करण्याची प्रवृत्ति, किंवा इच्छा होणें. उदा. तूं मुळीं देखील अभ्यास करीत नाहींस ! तुला अवदसा आठवली आहे ! अवाक्षर न बोलणें किंवा काढणें – अक्षरसुद्धां तोंडावाटें न काढणें. उदा. तुला मी चतुःशृंगीला नेईन, म्हणून एकदा सांगितलें; आतां

पुढे वाचा

“अंतर”

“अंतर” या शब्दाचा अर्थ – दोन वस्तूंतील किंवा स्थितींतील तफावत. दूरपणाचें माप. एकाद्याला अंतर देणें – प्रेम कमी करून त्याचा परित्याग करणें. उदा. माझ्या जिवांत जीव आहे तोंपर्यंत मी ह्या धाकट्या भावाला अंतर देणार नाहीं, अशी मी बाबांच्या मरणसमयीं त्यांच्या पायांवर हात ठेवून शपथ घेतली होती. अंतर पडणें – मित्रत्वांत,

पुढे वाचा

“अंत” हा शक्यतो वाईट प्रसंगी वापरण्यात येणारा शब्द आहे. परंतु , तो शब्द इतरही वापरतात. कुठे ?

“अंत” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) शेवट, मृत्यु, समाप्ति. उ० इ० सन १६८० च्या एप्रिल महिन्याच्या ५ व्या तारखेस, रविवारीं, श्रीशिवाजी महाराजांचा अंत झाला, (म्ह० ते मरण पावले). उदा. “माझा ग्रंथ अद्यापि अंतास गेला नाहीं”. (ख) (व्याकरणांत) शेवटचा स्वर. उदा. ‘घोडा,’ हा शब्द आकारान्त

पुढे वाचा

अंगाई करणें, अग्निकाष्ठें भक्षण करणें, अटकेस झेंडा मिरविणें किंवा लावणें, एकाद्याचीं अंडींपिल्लीं बाहेर काढणें

१. अंगाई करणें – मुलाला निजवितांना आया जें गाणें म्हणतात, त्याच्या आरंभीं ‘अंगाई’ हा शब्द आहे; यावरून ‘अंगाई करणें’ म्हणजे निजणें किंवा निजविणें. मोठ्या माणसांच्या संबंधानें हा वाक्प्रचार विनोदानें योजण्यांत येतो. २. अग्निकाष्ठें भक्षण करणें – अग्नींत प्रवेश करणें; स्वतःस जाळून घेणें. उदा. छत्रपति शिवाजी महाराजांची एक बायको मोहित्यांची कन्या

पुढे वाचा

“हात पाय”

“हात पाय” या दोन शब्दापासुन सुरु होणारे वाक्य व त्यांचे अर्थ पुढे दिल आहेत. हात पाय गळणें – (क) खचून जाणें, नाउमेद होणें, धीर सोडणें. उदा. अरे, तूं एकदाच नापास झालास आणि तुझे हात पाय गळाले ? आश्चर्य आहे ! उमेद बाळग. यंदा नाहीं तर पुढच्या वर्षीं पास होशील !

पुढे वाचा