“नाक”

नाक(क) घ्राणेंद्रिय; नासा किंवा नासिका. 
 (ख) बटाटा, आलें, धान्याचा दाणा, वगैरेंना ज्या ठिकाणीं मोड फुटतो किंवा नवा अंकुर उत्पन्न होतो, तें ठिकाण. 
 (ग) सुईच्या माथ्याजवळचें छिद्र, ज्यांत दोरा ओवितात तें. 
 (घ) एकाद्या देशाचा, किंवा गांवाचा, किंवा संस्थेचा, अग्रगण्य माणूस, किंवा पुढारी.उ० रामपाटील आमच्या गांवाचें नाक आहेत.
 (ङ) एकाद्या देशाचा महत्त्वाचा किल्ला, किं० शहर, किं० स्थल.उ० मुंबई शहर हें हिंदुस्थानचें नाक आहे.
 (च) नथ नाकांत घालण्यासाठीं पाडलेलें छिद्र.उ० गोदीला इतकी जड नथ घालावयास देऊं नका. तिचें नाक ओघळत चाललें आहे पहा!
 (छ) आबरू.उ० माझें नाक गेलें (किंवा गमावलें) खरें, हें माझें मीच कबूल करतों!
 (ज) “नायक” शब्दाचा अपभ्रंश; महारांच्या नांवापुढें बहुमानार्थी लावावयाचा शब्द.उ० रामनाक, भागनाक, इ०
कोणत्या नाकानें?कोणच्या तोंडानें? कसा?उ० तें काम मी करीन म्हणून प्रतिज्ञा भोगिली होती. पण तें काम दुर्दैवानें फिसकटलें, आतां मी श्रीधरपंताकडे कोणत्या नाकानें जाऊं?
आपलें नाक कापून दुसऱ्यास अवलक्षण करणेंआपलें नाक कापून काढून, त्याचेपुढें जाऊन, त्याला अपशकुन करणें; दुसऱ्याचें नुकसान व्हावें, म्हणून आपलें कांहीं तरी नुकसान करून घेणें. [बिननाकाचा मनुष्य पुढें आला असतां अपशकुन होतो, अशी आपली समजूत आहे]. 
उंच नाक करूननिर्लज्जपणानें; बेशरमपणानें. 
एकाद्याचें नाक कापणेंत्याचा रेच उतरणें; त्याचा गर्व हरण करणें; त्याचा नक्षा उतरणें. 
एकाद्याचें नाक खालीं पडणें किं० होणेंत्याचा गर्व नाहींसा होणें. 
एकाद्याचें नाक खालीं पाडणें किं० करणेंत्याचा गर्व नाहींसा करणें. 
एकाद्याचे पुढें नाक घासणेंत्याच्या पायीं नम्र होणें; त्याची क्षमा मागणें; दासाला योग्य असा नम्रपणा त्याचे पुढें स्वीकारणें. 
नाक जळणेंनाकाला दुर्गंधी असह्य होणें. 
नाक तोंड मुरडणें किं० नाकें तोंडें मुरडणेंनापसंती दर्शविणें. 
एकाद्याचें नाक चेचणें किं० ठेचणेंत्याची फजीती करणें, पारिपत्य करणें. [येथे “नाक” ह्याचेबद्दल “नकटी” हा शब्दही योजण्यांत येतो.] 
नाक मुरडणेंनापसंती दाखविणें.खुशामत करावया मजकडे न येती जन,
पथीं मजसि देखतां न करिती मला वंदन।
मला म्हणुनि मूर्ख ते मुरडितात नाकें अहा!
सरोनि अधिकार मी अहह! तुच्छ झालों पहा!॥
                                                   वि० वा० भिडे.
त्यानें (आपलें) नाक तोडून कडोसरीस खोवलें आहे.तो भारी निर्लज्ज झाला आहे. 
एकाद्याचें नाक धरणेंत्याचा खोळंबा करणें. 
नाक, किं० नाकपुड्या, फेंदारणें, किं० पिंजारणेंनाक फुगवून राग दाखविणें. 
नाक मोडणेंनाक वांकडें तिकडें करून नापसंती दर्शविणें. 
एकाद्याचें नाक मोडणेंत्याची फजीती उडविणें; त्याचा रेच उतरणें. 
नाक वर करून(क) ताठ्यानें, गर्वानें, तिरस्कारानें. 
 (ख) निर्लज्जपणानें.उ० तुझ्या पदरांत मी चुकी घातलीं, तरी पुन्हा नाक वर करून बोलतोस? तुला म्हणावें तरी काय?
एकाद्याच्या नाकांत काड्या घालणें किं० सारणेंत्याला खिजविणें, त्याची कुरापत काढणें; त्याला चेतविणें; त्याला राग आणणें.उ० हरिच्या पुन्हा पुन्हा कां काड्या नाकांत घालिशी शशका?।
यश काय पक्षिपतिचें येइल हे चार करुनि तुज मशका?॥
                                                         मोरोपंत
एकाद्याच्या नाकांत काड्या जाणेंत्याला एकादी गोष्ट न आवडल्यामुळें तो रागावणें.उ० त्यानें गोविंदरावाशीं स्नेह केला, तर तुझ्या नाकांत कां काड्या जाव्या!
नाकांत बोलणेंगेंगाण्या स्वरानें बोलणें. 
नाकानें कांदे, किं० वांगीं, सोलणेंनसता शुचिर्भूतपणा, पवित्रपणा दाखविणें; नसता अभिमान दाखविणें; बढाया मारणें. 
एकाद्याच्या नाकावर पाय देणेंत्याची पर्वा न करणें. 
नाकावर वाट करणेंत्याची पर्वा न करणें. 
नाकावर माशी बसूं न देणेंअपमान, किं० तिरस्कार, अगदीं सहन न करणें. 
त्याच्या नाकीं, (किं० नाकाशीं), सूत धरलें आहेतो आतां मरतो कीं घटकेनें मरतो, अशी त्याची स्थिति झाली आहे.
टीप–मरणोन्मुख मनुष्याचा श्वासोच्छ्वास चालतो आहे किंवा नाहीं, हें पहाण्यासाठीं त्याच्या नाकाशीं सूत धरतात; तें हलले नाहीं तर तो मेला असें समजण्यात येतें.
 
एकाद्याच्या नाकास चुना लावणेंत्याची खजाळी काढणें; त्याच्या पुढें धमकीनें भांडावयास सिद्ध होणें. 
नाकासमोर जाणेंअगदीं सरळ मार्गानें जाणें. 
नाकीं दुराही, (किं० नाकदुऱ्या), काढणेंअतिनम्रपणानें विनविणें शरण जाणें. 
एकाद्याच्या नाकीं वेसण घालणेंत्याला आपल्या कबज्यांत आणणें किं० कह्यांत ठेवणें. 
नकट्यापुढें नाक खाजविणेंत्याला खिजविणें. 
नाक मुठींत धरूननिरुपायास्तव; नाइलाजानें. 
‘नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत’ असें म्हणणेंनिर्लज्जपणानें बोलणें किं० वागणें. 
एकाद्याचें नाक झाडणेंत्याचा रेच उतरणें; त्याची फजीती करणें. त्याचें पारिपत्य करणें. 
नाक वर असणेंवरचढ असणें. 
नाकाची घाण मरणें किं० जाणेंवाईट वासानें त्रास होईनासा होणें, (संवईमुळ, पडशामुळें किं० अन्य कारणानें) 
नाकापेक्षां मोतीं जड होणें(क) यजमानापेक्षां नोकराची मिजास, किं० मानमान्यता, अधिक होणें. 
 (ख) एकाद्याच्या अंगाचा खरा गुण लोकांच्या अपेक्षहून कमी आहे, असें निदर्शनास येणें (मोलस्वर्थ). 
नाकाला जीभ लावणेंतिरस्कार दाखविणें. गर्व किं० ताठा किं० दिमाख दाखविणें. 
नाकाला पदर लावणेंअपकीर्तीमुळे तोंड झांकणे; लज्जेनें तोंड झांकणें. 
एकाद्याच्या नाकावर रुपये, पैसे वगैरे, टिचणेंते देण्याला आपण नाखूष असलों तरी ते त्याला देणें; नाइलाजास्तव ते त्याला देणें. 
नाकावर बोट ठेवणेंएकाद्याला चूप रहा म्हणून आपल्या नाकावर आपलें बोट ठेवून खूण करणें. [रागानें, कि० अन्य कांहीं कारणानें]. 
नाका ओठावर जेवणेंचोखंदळेपणानें जेवणें. 
एकाद्याच्या नाकीं नऊ, किं० नव, येणेंकांहीं काम करतांना त्याला अति त्रास, श्रम, उपद्रव, दुःख, होणें. 
त्याच्या नाकावर राग आहे, किं० अगदीं ठेवलेलातो जरा कांहीं कारण झालें, किं० सांपडलें, कीं रागावत असतो. 
एकाद्याच्या नाकांतला बालत्याच्या आवडीचा, किं० प्रेमाचा, माणूस.उ० आलीकडे नारोबा हा शिवरामपंताच्या नाकांतला बाल झाला आहे.
नाका-डोळ्यांचा, कि० नाका-कानांचा वैद्यवैद्यविद्येत वाकबगार नसलेला व वृथा बडबड करणारा वैद्य. 
नाकाचा पडदादोन नाकपुड्यांच्या मधला पडदा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!