IMPS ने त्वरीत पैसे पाठवा (ट्रांस्फर करा) | IMPS (Immediate Payment Service in Indian banking system) म्हणचे काय ? | त्याचे नेमके काय फायदे आहेत | IMPS NEFT RTGS UPI बद्दल जाणून घ्या

IMPS ही अशी सुविधा आहे, ज्याद्वारे आपण एका अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंट वर लगेचच पैसे पाठवू (ट्रांस्फर करू) शकतो.  बाकी पद्धतीने पैसे पाठवायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे Emergency च्या वेळेला IMPS ने पेसे पाठविणे सोयीचे ठरते. रात्र असो वा दिवस, कधी ही आपण ही सुविधा वापरू शकतो. NEFT किंवा RTGS ने फक्त ठरलेल्या वेळेतच पैसे पाठवू (ट्रांस्फर करू) शकतो. भारतातील जवळपास १५० हून अधीक बँकांमध्ये IMPS ची सुविधा दिलेली आहे. २०१० मध्ये एनपीसीआय (NPCI) ने प्रमुख बँकांच्या मदतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून IMPS ची सुरुवात केली व आज ती मेहनत अनेकांच्या फायद्याची ठरली आहे.

IMPS वापरण्यासाठी, शुल्क अगदी नाममात्र आहेत.  दररोज 2 लाख रुपयापर्यंत आपण पैसे पाठवू (ट्रांस्फर करू) शकतो.  या शिवाय मोबाईलवरही IMPS आयएमपीएस उपलब्ध आहे ज्यामुळे ते अधिक सोयीस्कर बनते. एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) या सुविधा बँकाच्या आणि इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी वापरू शकत नाही. परंतु, आयएमपीएस (IMPS) 24×7 उपलब्ध असल्याने आपण निश्चिंत राहू शकतो. IMPS ही इतर सुविधांप्रमाणे, Reserve Bank of India (RBI) च्या नियमांना बांधील असल्यामुळे त्यात इतर शंकेला वाव नाही.

IMPS द्वारे पैसे कसे पाठवाता येतील ?

IMPS ही सुविधा नेट-बँकिंग आणि मोबाइल बँकिंग दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. 

नेट-बँकिंग साठीच्या स्टेप्स

 • आपल्या बँकेच्या नेट-बँकिंग वेबसाईट मध्ये लॉग इन करा;
 • ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्यांचे खाते क्रमांक, खाते प्रकार, आयएफएससी कोड, नाव आणि संपर्क क्रमांक भरून त्या अकाउंट ला लाभार्थी म्हणून जोडावे.
 • लाभार्थी म्हणून जोडाले गेल्यावर, “फंड ट्रान्सफर” लिंक वर जा आणि मग ज्याला आपण फंड ट्रान्सफर करू इच्छितो, तो लाभार्थी निवडा.
 • एकदा आपण लाभार्थी निवडला की लाभार्थी च्या खात्याचा तपशील दिसून येईल. किती रक्कम ट्रान्सफर करायची आहे ते लिहा.
 • ट्रान्सफर करण्यासाठी निश्चीत करा.  पैसे,  आयएमपीएस IMPS द्वारे लगेच ट्रान्सफर केले जातील.

मोबाइल बँकिंग साठीच्या स्टेप्स

 • आपल्या बँकेच्या मोबाइल बँकिंग ॲप्लीकेशन मध्ये लॉग इन करा.
 • ज्याला पैसे पाठवायचे आहेत , त्यांचे अकाउंट आधी जोडलेले नसेल, तर ते लाभार्थी म्हणून जोडा. त्या साठी नेट-बँकिंग सेक्शन मध्येस्टेप्स दिलेल्या आहेत.
 • “Fund Transfer” / “Send Money” टॅबवर क्लिक करा आणि आयएमपीएस पर्याय निवडा.
 • लाभार्थीचा मोबाइल नंबर, ट्रान्सफर करायची रक्कम आणि लाभार्थीचा मोबाइल मनी आयडेंटिफायर (एमएमआयडी) नंबर टाका.
 • खात्री करण्यासाठी, मोबाइल पिन (एमपीआयएन) टाका.
 • आपले पैसे ट्रान्सफर केले जातील आणि त्यानंतर बँक आपल्याला व्यवहार क्र (ट्रांझ्याक्शन नंबर).
 • अभिप्राय देताना / चौकशी व तक्रारींसाठी, व्यवहार क्रमांक (ट्रांझ्याक्शन नंबर) चा वापर करावा.

आयएमपीएस IMPS द्वारे पैसे प्राप्त करण्यासाठी

 1. ज्यांच्याकडून पैसे प्राप्त करायचे आहेत, त्यांना फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आणि मोबाईल मनी आयडेंटिफायर (एमएमआयडी) द्या.  पुढील व्यक्ती, आयएमपीएस द्वारे आपणास पैसे पाठवू शकेल.

आयएमएस ( IMPS ) ची वैशिष्ट्ये कोणती आहेत ? ते का वापरावे ?

 1. आयएमएस ( IMPS )  फंड ट्रान्सफर सिस्टम २०१० मध्ये सुरू करण्यात आली आहे.
 2. पैशांच्या ट्रान्सफर साठी आयएमपीएस सर्वात वेगवान आणि एक विश्वासार्ह मार्ग आहे.
 3. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) देखील या सीस्टम वर आधारीत आहे.
 4. आयएमपीएस IMPS ही सुविधा, नेट-बँकिंग आणि मोबाइल-बँकिंग दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येते. हि सेवा सार्वजनिक आणि बँकांच्या सुट्टीच्या दिवशी देखील उपलब्ध असते.
 5. मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे, कोणत्याही व्यक्तीला फक्त त्याचा मोबाइल नंबर आणि मोबाइल मनी आयडेंटिफायर (एमएमआयडी) वापरून पैसे पाठवता येतात. त्यासाठी, बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नसते.
 6. पैसे ट्रान्सफर झाल्याची सूचना बँक दोन्ही व्यक्तींना पाठविते. जो पैसे पाठवितो व ज्यांना पैसे पाठविले गेले आहेत.
 7. सध्या आयएमपीएस IMPS द्वारे किमान 1 रुपया आणि दररोज जास्तीत जास्त 2 लाख रुपये पाठविता येतात.

फंड ट्रान्सफर करण्यासाठी IMPS व्यतिरिक्त इतर कोणते प्लॅटफॉर्म आहेत ?

भारतात फंड ट्रान्सफर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर प्लॅटफॉर्म मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) NEFT आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) RTGS यांचा समावेश आहे.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) NEFT काय आहे ? NEFT ने पैसे कसे ट्रान्सफर करतात ? National Electronic Fund Transfer

 • आरटीजीएस RTGS आणि आयएमपीएस IMPS  प्रमाणे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) NEFT द्वारे फंड ट्रान्सफर रिअल-टाइम तत्त्वावर होत नाहीत.  दर तासाने त्याचे  ट्रान्सफर होत असतात. म्हणजेच, जर आपल्याला त्वरीत पैसे पाठवायचे असतील तर, NEFT हा पर्याय योग्य नाही.
 • एनईएफटी NEFT करतांना ज्यांना पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांचे खाते क्रमांक, बँक व शाखेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड IFSC code माहिता पाहीजे. या details शिवाय NEFT वापरता येत नाही.
 • NEFT ही सेवा online किंवा offline (म्हणजे बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन) वापरता येते.
 • रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनां नुसार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) ही सेवा, १  डिसेंबर, २०१9 पासून २4 x 7 उपलब्ध आहे. परंतु बँक शाखा बंद झाल्यावर, नेट – बँकींग चा वापर करावा लागतो.
 • NEFT सेवा वापरण्यासाठी, काही शुल्क द्यावे लागतात. काही, प्रमुख बँकाचे शुल्क खाली दिलेले आहेत.

हवे तितके पैसे पाठवा – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट RTGS – Real Time Gross Settlement काय आहे ? काहीही मर्यादा नाहीत

 • RTGS चा वापर शक्यतो उच्च-मूल्याच्या व्यवहारासाठी केला जातो कारण इतर पद्धती मध्ये विशिष्ठ मर्यादा ठरलेल्या आहेत. किमान २ लाख रूपये किंवा त्यापुढील रक्कम पाठवायची असेल तर, RTGS चा वापर करणे योग्य ठरेल.
 • RTGS चा वापर करतांना ज्यांना पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांचे खाते क्रमांक, बँक व शाखेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड IFSC code माहिता पाहीजे. या details शिवाय RTGS वापरता येत नाही.

UPI Unified Payment Interface – युनिफाइड पेमेंट इंटरफेस चा काय उपयोग ? कोणते मोबाईल ॲप्स ने UPI पेमेंट करू शकता – पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वांत सोपी पद्धत – UPI वापर

 • UPI ने पेमेंट करणे अत्यंत सोप आहे. आपल्याला खाते क्रमांक, खाते प्रकार, आयएफएससी कोड किंवा बँकेचे नाव लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
 • मोबाईल नंबर किंवा व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (यूपीआय आयडी) वापरुन रिअल-टाइम बँक-टू-बँक पेमेंट केली जाऊ शकते. यूपीआय आयडी हा प्रत्येक बँक खात्यासाठी एक वेगळा क्रमांक आहे ज्याचा वापर पैसे पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. UPI PIN -यूपीआय पिन हा 4-अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक आहे जो पैसे पाठविण्याची प्रक्रीया निश्चीत व अधीकृत करतो.
 • UPI ने पैसे पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, फक्त UPI ID – यूपीआय आयडी आणि PIN -पिन पुरेसे आहे.
 • असे बरेच मोबाईल अॅप्स येत आहेत ज्यामध्ये UPU – यूपीआय पेमेंट करता येते.  Google Pay गूगल पे, Phone Pe फोन पे, FreeCharge फ्रीचार्ज, MobiKwik मोबिक्विक आणि इतर बरेच.

भारतात आयएमपीएस सेवा ( IMPS Service) देणाऱ्या बँकांची यादी

 • आंध्र बँक –
 • अलाहाबाद बँक –
 • आदर्श को-ऑपरेटिव्ह बँक लि. –
 • अ‍ॅक्सिस बँक –
 • बंधन बँक लि. –
 • बँक ऑफ इंडिया –
 • बँक ऑफ बडोदा –
 • बेसिन कॅथोलिक को-ऑप बँक –
 • बँक ऑफ महाराष्ट्र –
 • कॅनरा बँक –
 • बीएनपी परिबास –
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया –
 • कॅथोलिक सीरियन बँक –
 • सिटी युनियन बँक –
 • सिटीबँक –
 • कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक –
 • कॉर्पोरेशन बँक –
 • सिंगापूरची विकास बँक –
 • देना बँक –
 • धनलक्ष्मी बँक –
 • विकास क्रेडिट बँक –
 • फेडरल बँक –
 • डोंबिवली नागरी सहकारी बँक –
 • एचएसबीसी –
 • एचडीएफसी बँक –
 • आयडीबीआय बँक –
 • आयसीआयसीआय बँक –
 • इंडियन ओव्हरसीज बँक –
 • इंडियन बँक –
 • आयएनजी वैश्य बँक –
 • इंडसइंड बँक –
 • जनता सहकारी बँक, पुणे –
 • जम्मू आणि काश्मीर बँक –
 • करुर वैश्य बँक –
 • कर्नाटक बँक –
 • केरळ ग्रामीण बँक –
 • लक्ष्मी विलास बँक –
 • कोटक महिंद्रा बँक –
 • नैनीताल बँक –
 • मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक –
 • एनकेजीएसबी सहकारी बँक –
 • प्रगती कृष्णा ग्रामीण बँक –
 • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स –
 • पंजाब आणि सिंध बँक –
 • पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑप बँक –
 • राजकोट नागरीक सहकारी बँक लि. –
 • पंजाब नॅशनल बँक –
 • सारस्वत बँक –
 • आरबीएल बँक –
 • स्टँडर्ड चार्टर्ड बँक –
 • साउथ इंडियन बँक –
 • स्टेट बँक ऑफ इंडिया –
 • सिंडिकेट बँक –
 • ठाणे जनता सहकारी बँक –
 • तामिळनाद मर्केंटाईल बँक –
 • ए.पी. महेश अर्बन को-ऑप बँक –
 • युको बँक –
 • ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक –
 • युनियन बँक ऑफ इंडिया –
 • विजया बँक –
 • युनायटेड बँक ऑफ इंडिया –
 • येस बँक –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!