नख. | (क) मानवी हाताच्या, किं० पायाच्या, बोटांच्या टोकांना शिंगाच्या जातीचें जें पातळ चकचकीत कवच असतें तें. | |
(ख) पक्ष्याचा किंवा पशूचा | ||
(ग) खवल्या मांजराच्या अंगावरचा एक एक खवला. | ||
(घ) नखानें येईल, किं० नखावर राहील, इतकें. | उ० औषधाचें नख; चुन्याचें नख; कुंकवाचें नख. | |
जेथें नख नको तेथें कुऱ्हाड लावणें | नखानें होण्याजोग्या कामीं कुऱ्हाडीचा उपयोग करणें; थोडक्या श्रमानें, किंवा मृदुपणानें, जें कार्य होण्याजोगें आहे, त्याच्यासाठीं पुष्कळ शक्ति खर्च करणें, किंवा फार कठोरपणा करणें. याच अर्थाचें मोरोपंताचें पुढील आर्यार्ध पहा:– नखहि नको ज्या कार्या, त्या काढावा कशास करवाल?॥ | |
नख दृष्टीस न पडणें | मुळींच न दिसणें, पडद्याच्या आंत राहणें; अतिमर्यादशीलदणानें राहणें. | उ० ती मराठमोळ्यांतली स्त्री आहे, तिचें नख तुझ्या दृष्टीस पडणार नाहीं! |
नख नख बोलणें | ऐटीनें, किंवा कुरेंबाजीनें, बोलणें. | |
नख शिरणें | थोडासा शिरकाव होणें. | |
नखाएवढा | अगदीं थोडा. | |
नखाने काम करणें | नाजुकपणाचा आविर्भाव किंवा दिमाख करून काम करणें. | |
एकाद्याला नखावर खेळविणें किंवा चाळविणें | त्याची करमणूक करावयास झटणें. | |
नखावर चालणें | नाजुकपणाची ऐट करून चालणें. | |
नखावर जेवणें | चोखंदळेपणानें जेवणें; आपणाला भलतें सलतें चालत नाहीं, अशी मिजास करून जेवणें. | |
नखावर दिवस मोजणें | उत्कंठेनें मार्गप्रतीक्षा करणें. | |
नखाला आग लागली | संकटांस नुसती सुरवात झाली; अझून पुष्कळ संकटें यावयाचीं आहेत. | |
नखें चावीत, कुरतुडीत, किंवा वाजवीत बसणें | (क) निरुद्योगी असणें; उद्योगधंदा न करतां राहणें. | |
(ख) हिरमुष्टें होऊन बसणें. |