“मन”

मन(क) सुखदुःखादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. 
 (ख) संकल्पादिरूप मनाची वृत्ति. 
 (ग) सदसद्विवेकबुद्धि.उ० तुझ्या मनाला जर तें योग्य दिसत असलें तर कर.
ज्याचें मन त्याला ग्वाही देतेंआपण केलेलें कोणतेंही कृत्य योग्य आहे कीं अयोग्य आहे, खरें आहे कीं खोटें आहे, चांगलें आहें कीं वाईट आहे, ह्या संबंधाची खातरी प्रत्येक मनुष्याच्या अंतर्यामाला झालेली असते, मग तो मनुष्य बाह्यात्कारीं कांहीं कां बोलेना, किं० लोक त्याच्याबद्दल कांहीं कां बोलेनात ! 
मनाएवढा ग्वाही त्रिभुवनांत नाहींआपल्यासंबंधानें जें कांहीं खरें असेल, तें आपल्या मनास समजतच असतें ! 
मान सांगावा जना, अपमान सांगावा मनाआपणास मिळालेल्या संमानाबद्दल आपण लोकांत बढाई मारावी; पण आपला अपमान मनांतच ठेवावा, त्याची वाच्यता करूं नये. 
मन घालणें, देणें, किं० लावणेंमन एकाग्र करून ते एकाद्या वस्तूवर, किं० कार्यावर, आसक्त करणें, किं० व्यापृत करणें.उ० माझ्या कामांत तूं मन घालूं नको. तें काम माझें मी पार पाडीन.
  उ० तूं मन लावून अभ्यास केलास, तर यंदा तुझी परीक्षा खचित उतरेल.
एकाद्या पदार्थावरून, किं० माणसावरून, मन उडणें, किं० उतरणेंतो आवडेनासा होणें; त्याचेपासून मन निवृत, किं० परांङ्मुख होणें; त्याचा मनाला वीट येणें.उ० ह्या सखलादी अंगरख्यावरून आलीकडे माझें मन उडालें आहे.
  उ० नारायणरावावरून माझें मन आतां पुरतें उडालें.
मन तुटणेंमन पराङ्मुख होणें; मनांत अप्रीति, किं० कंटाळा, उत्पन्न होणें.उ० ‘फुटलें मोतीं, तुटलें मन, सांधूं न शके विधाता.’
एकाद्याचें मन पाहणेंत्याचे विचार काय आहेत, हें अजमावणें; त्याच्या मनाचा कल कोणीकडे आहें, हे त्याच्या भाषणादिकांवरून ठरविणें. 
एकाद्या पदार्थावर, किंवा इसमावर, मन बसणेंतो आवडीचा, किंवा प्रेमाचा होणें; त्याचेवर मन आसक्त होणें.उ० माझें मन ह्या खणावर बसलें आहे. आई, असल्या खणाचा परकर मला शिवशील ?
मन लागणेंमन आसक्त किंवा व्यापृत होणें.उ० गंगारामाचा मुलगा मेल्यापासून त्याचें मन दुकानाकडे लागेनासें झालें आहे.
एकाद्याचें मन मनावणेंत्याचें मन आपणाकडे ओढून घेणें, त्याला अनुकूल करून घेणें. 
मन मानेल तसें करणेंआपल्या इच्छेला येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें, उच्छृंखळपणानें, वागणें. 
मन मोठें करणेंउदारपणा दाखविणें. 
एकाद्याचें मन मोडणेंत्याच्या इच्छेच्या, किंवा मर्जीच्या, उलट जाणें; त्याची आशा विफल करणें. 
मनांत गांठ ठेवणेंअंतर्यामीं वैरभाव, द्वेषबुद्धि, सूढ घेण्याची इच्छा, जागृत ठेवणें. 
मनांत गांठ बांधणें किंवा घालणें, किंवा बांधून किंवा घालून असणेंनीट ध्यानांत धरून ठेवणें; पक्कें लक्ष्यांत बाळगून असणें. 
मनांत नव मण जळणेंमनांत अतोनात द्ध, संतप्त असणें; मनांत द्वेष, सूढ घेण्याची इच्छा, जागृत ठेवून असणें. 
मनांत मांडें खाणेंमनोराज्य करणें. 
मनांत म्हणणेंआपल्याशीं, किंवा स्वगत, म्हणणें. 
एकादें काम मनावर घेणें(क) त्याच्यासाठीं कळकळीनें झटणें; त्याच्या सिद्धीसाठीं आस्थेनें प्रयत्न करणें. 
 (ख) तें महत्त्वाचें समजणें. त्याला किंमत देणें; त्याचेकडे लक्ष्य देणें.उ० तो वेडा आहे, तूं त्याचें बोलणें मनावर घेऊं नको !
  उ० मी रागाच्या झपाट्यांत तुम्हाला अपशब्द बोललों, ते मनावर घेऊं नका; (म्ह० ते विसरून जा.)
मनास येणेंआवडणें.उ० हा खण तुझ्या मनास येतो काय ?
  उ० कोण तुझ्या मनासि येतो सांग वो ! सीते !
                                                              आनंदतनय.
मनांत कालवणेंअंतःकरणांत अतिकष्टी होणें; तीव्र दुःख पावणें.उ० दशरथाच्या आज्ञेनें राम वनाला निघालेला पाहून सर्व अयोध्यावासी जन मनांत कालवले.
मनीं धरणें किंवा वागविणेंलक्ष्यांत बाळगणें.उ० मनिं नित्य वागवावें की गुरुचा बोल मज न लागावा.
एकादी गोष्ट मनीं मानसीं नसणेंती अगदीं मनांत देखील किंवा स्वप्नांत देखील, आलेली नसणें.उ० हीं मोत्यें तुला मिळूं नयेत. असें माझ्या मनीं मानसीं देखील नव्हतें !
मनानें घेणेंमनाचा ग्रह होणें, मत ठरणें.उ० चाकवताची भाजी खाल्यानें ओकावयास होतें, असें त्याच्या मनानें घेतलें आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!