खाक | छाती आणि पाठ यांच्यामधील खांद्याखालचा खळगा; बगल. | |
खाक वर करणें | आपल्याजवळ कांहीं नाहीं असें दाखविणें, किं० सांगणें. | |
त्यांनीं खाका वाजविल्या | त्यांना अत्यानंद झाला. | |
खाकेंतून काढून बाजारांत मांडणें | आपली खोटी कृति खरी म्हणून सांगत फिरणें. | |
एकाद्याला खाकेस मारणें | आपल्या संरक्षणाखालीं, किं० आश्रयाखाली घेणें. | |
एक वस्तु खाकेस किं० खाकोटीस मारणें | ती पळवून नेणें; ती आपली आहे असे गृहीत धरून, किं० बाहाणा, किं० आविर्भाव करून घेऊन जाणें. |