“कपाळ”

कपाळ(क) भिवयांच्या वरचा व मस्तकाच्या खालचा जो प्रदेश तो. 
 (ख) नशीब, दैव, पूर्वकर्माचा परिपाक.उ० पुत्राचे सुख माझ्या कपाळीं नाहीं.
कपाळ उठणें कि० चढणेंत्रास, पीडा, किं०उपद्रव होणें. 
कपाळ काढणेंवैभवास चढणें.उ० ह्या मुलाच्या विद्येला पैसा खर्च करावयास तुम्ही कचरूं नका. तो चांगलें कपाळ काढील, असा मला रंग दिसत आहे. याच अर्थाने ‘ नशीब काढणें ‘ असाही वाक्प्रचार आहे.
एखाद्यावर कपाळ टेकणेंत्याच्यावर भरवंसा किं० भिस्त ठेवून असणें. 
कपाळ धुवून पाहणेंनशीबी काय आहे तें पाहणें. 
 एकाद्याचें कपाळ फुटणेंत्याच्यावर दुर्दैव ओढवणें. उ० त्या बाईनें नवऱ्यासाठी किती पैसे खर्चिले ! किती नवस केले ! पण कांहीं उपयोग झाला नाहीं. शेवटी तिचे कपाळ फुटलें ! (म्हणजे तिचा नवरा मेला).
कपाळाचें कातडें नेणेंदुर्दैवी स्थितींत पाडणें. विपत्तींत लोटणें. 
एकाद्याच्या कपाळाची रेषा उघडणें (किं० उपटणें)त्याला अकल्पित रीतीनें सुदैव प्राप्त होणें. 
कपाळाला केस उगवणेंअशक्य गोष्ट घडणें. उ० तो रामा पास झाला काय ? कपाळाला केस उगवले असेंच म्हटलें पाहिजे !
कपाळावर हात मारणेंआश्चर्य, दुःख वगैरे भावनांनीं कपाळावर हातानें ताडन करणें; नशिबास दोष लावणें. 
एकाद्याच्या कपाळाशीं कपाळ घासणेंत्याच्याशीं सहवास करणे; त्याच्या संगतीत राहणें; त्याच्या कच्छपीं असणें. 
एकाद्याच्या कपाळाला अपकीर्ति, अपयश, दारिद्य इ० येणेंत्याच्या भोगाला अपकीर्ति, इ० येणें. 
एकाद्याच्या कपाळीं डाग लागणेंत्याची बेअब्रू , फजिती होणें 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!