कान | (क) प्राण्याचें श्रवणेंद्रिय. | |
(ख) मोदकपात्र, कढई, वगैरे भांडी धरावयासाठीं, किं० उचलावयासाठीं केलेली. जीं साधनें तीं प्रत्येक. | ||
(ग) कानाच्या पाळींत वगैरे दागिना अडकविण्यासाठी पाडलेलें भोक. | उ० तुमच्या गजाननाचा भिकबाळीचा कान बुजला आहे. | |
(घ) बंदुकीला बत्ती लावावयाची जागा. (ह्या अर्थाने ‘काना’ हा शब्द अधिक प्रचलित आहे). | ||
एकाद्याचे कान उघडणें | त्याचा मूर्खपणा दाखवून देऊन किंवा त्याचें हिताहित कशांत आहे हे समजाऊन देऊन त्याला सन्मार्गावर आणणें. ह्याच अर्थानें ” कानउघडणी ‘ या नामाचाही उपयोग होतो. उ० मी त्याची चांगली कानउघडणी केली ] | उ० सदोबाचे कान उघडण्यासाठीं मीं पुष्कळ प्रयत्न केले परंतु व्यर्थ! |
एकाद्याचे कान उघडून सांगणें | त्याला स्पष्ट शब्दांनीं बजावणें. | |
एकाद्याचा कान धरणें | अपराधाला शिक्षा करण्यासाठीं त्याचा कान पिरगाळणें. | |
एकाद्याचा कान पिळवटणें | अपराधाला शिक्षा करण्यासाठीं त्याचा कान पिरगाळणें. | |
एकाद्याचा कान पिळणें | अपराधाला शिक्षा करण्यासाठीं त्याचा कान पिरगाळणें. | |
कान कापणें किं० कान कापून हातावर देणें | (क) फसविणें. | उ० दुकानदारानें माझा चांगला कान कापला! |
(ख) पराभव करणें; एकाद्याच्यावर चढ करणें. | उ० त्यानें सर्व लोकापुढें प्रतिज्ञा केली कीं जर तुम्ही उद्यां सारे याल तर मी तुमच्या समक्ष ह्याचे कान कापीन. छत्रे. इसापनीति. | |
कान किटणें | तीच तीच गोष्ट वारंवार ऐकून कंटाळणें. | उ० पुरे कर तुझें काशीयात्रेचें वर्णन ! तें ऐकून ऐकून आमचे कान किट्न गेले आहेत ! टीप-प्रयोजक भेदीं “कान किटविणे” ह्याचा अर्थ “तीच गोष्ट | पुन्हा पुन्हा सांगून कंटाळा आणणें.” असा होतो. |
कान झाडणें | (क) विनंती अमान्य करणें. | उ० मी त्याला माझ्यासाठीं एक नागपुरी धोतरजोडा विकत आणावयाला आज सांगितलें, पण त्यानें कान झाडले. |
कान टवकारून ऐकणें (किं० पाहणें) | लक्ष्यपूर्वक ऐकणें. किं०ऐकत राहणें. | उ० अभ्यासाकडे तुझें लक्ष्य असूं दे. आमच्या गोष्टी असा कान टवकारून कशाला ऐकत आहेस ? |
कान टोचणें | एकाद्याला एकादे काम करावयाला चेतविणें, चिथावणें, किं० उतेजन देणें. | |
सोनारानें कान टोचलेले पटतात | बलिष्ठ मनुष्याचा उपदेश मुकाट्याने पाळला जातो. शिरजोर माणसाचा हुकूम ऐकला जातो. | |
कानठळ्या बसणें (किं० बसविणें) | कशाच्या तरी मोठ्या आवाजानें कांहीं काळ श्रवणेंन्द्रिय बधिर होणें, (किं करणें). | उ० त्या सिंहाच्या गर्जनेने माझ्या कानठाळ्या बसल्या. |
एकाद्याचा कान धरून (किं० पिळून) घेणें | जबरदस्तीनें घेणें, हिसकावून घेणें; कोणाच्या कांहीं सबबी न ऐकतां घेणे; हक्कानें घेणें | उ० तें जाजम माझें आहे; त्याचें नव्हे. मी नाशकास जातांना ते त्याला वापरावयासाठीं दिले होतें, इतकेंच. कान धरून तें त्याच्यापासून मी घेईन. |
कान निवणें (किं० थंड होणें) | आनंदकारक खबर ऐकून हर्ष पावणें | उ० तुझ्या मुलाचे एकदाचें लग्न झालें, हें ऐकून माझे कान निवले. |
कान पाडणें | गलितधैर्य होणें; निराश होणें; आशा सफल होण्याचा रंग न दिसल्यामुळे खचणें. | उ० यंदा तें घर विकत जात नाहीं, हें पाहून त्यानें कान पाडले. टीप :-कांहीं प्राणी भयाचे किं० निराशेचे प्रसंगी आपले कान, (जे नेहमीं ताठ किं० उभे असतात,) ते खाली पाडतात. यावरून “कान पाडणे” ह्याचा वरीलप्रमाणे अर्थ झाला. |
आपला कान पिळून घेणें किं० कानाला खडा लावून घेणें | एकादी गोष्ट करून ती बिघडली, किंवा ती ज्याच्यासाठी केली असेल त्याला ती न आवडली,तर पुन्हां तसली गोष्ट न करण्याचा निश्चय करणें; एकदा ठेच लागल्यामुळें पुन्हां आपण तसे करणार नाहीं असा निर्धार करणें. | उ० तुझ्यासाठीं ही कढई मी मुद्दाम पुण्याहून आणली; आणि तुला तर ती आवडत नाहीं. पैसे माझ्या अंगावर पडले;आतां मी आपला कान पिळून घेतो (किंवा० कानाला खडा लावून घेतों) की पुन्हां कोणासाठीं कांहीं जिन्नस विकत घ्यावयाची नाहीं ! |
एखाद्याचे कानपूर ओस पडणें | तो बहिरा होणें. | उ० त्याच्याशीं इतक्या हळूं बोलून कांही उपयोग नाहीं; ओरडून बोला; त्याचें कानपूर ओस पडलें आहे! |
कानपूर ओस करून बसणें | आपणाला ऐकूं येत नाहीं असा बहाणा करणें. | |
कान पसरून ऐकणें | लक्ष्यपूर्वक ऐकणें (पण करावयाला न उठणें) | |
एकाद्याचे कान फुंकणे, भरणें, किं० भारणें | त्याला दुसऱ्याबद्दल वाईट सांगून त्याचें मन कलुषित करणें. | उ० वरिष्ठानें मला ही जागा देण्याचें कबूल केलें होते; पण कोणी दुष्टानें त्याचे कान फुकले; तेणे करून त्याचें मन फिरलें, आणि त्यानें ती जागा दुसऱ्याच एका माणसास दिली ! |
कान फुटणें | (क) बहिरा होणें. | उ० अरे तुला मघापासून मी ती खिडकी लावावयास सांगत आहे,आणि तूं कांहीं ती लावीत नाहींस ! तुझे कान फुटले आहेत काय ? |
(ख) कानामध्यें फोड येऊन कानांतून लस वाहूं लागणें. | उ० तुमच्या मुलाचा कान फुटला आहे, त्यांत गायीचे दूध घाला, म्हणजे तो बरा होईल. | |
कान येणें | ऐकण्याची शक्ति प्राप्त होणें. | उ० गर्भांतील मुलाला तिसऱ्या महिन्यांत कान येतात, असें म्हणतात. |
कान लांब होणें | अक्कल कमी होणें,मूर्ख होणें, विकळणें | उ० आलीकडे राम्याचे कान लांब झाले आहेत असें दिसतें. कारण, तो अगदों कोणाचें कांहीं ऐकत नाहीं ! टीप :–गाढवाचे कान लांब असतात, आणि गाढव मूर्ख असतें, ह्या वरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. |
कानाचा चावा घेणें | भलभलत्या, (किंवा खोट्यानाट्या),गोष्टीं सांगून दुसऱ्याचें मन कलुषित करणें. | |
कानाच्या कोपऱ्याला कळूं न देणें | कोणाच्याही जवळ न सांगणें. | उ० तुझी माझी मैत्री म्हणून हा माझा बेत मी तुला सांगत आहे; तूं तो कानाच्या कोपऱ्याला कळूं देणार नाहींस अशी माझी खात्री आहे. |
कानाचे किडे झाडणें | (क) चाहाड्या ऐकून एकाद्याचें मन कलुषित झालें असले तर, त्याला वस्तुस्थिति कळवून त्याचे मन शुद्ध करणें | उ० माझ्याबद्दल गोविंदरावानें नानासाहेबांचें मत कलुषित केलें होतें; परंतु मला ह्या प्रकाराची शंका येतांच मी नानासाहेबांच्या कानाचे किडे झाडले, तेव्हां माझ्याविषयी त्याचें मन निवळलें |
(ख) एकाद्याला बोध करणें; रागें भरणें. | ||
कानांत जपणें किं० मैत्र सांगणें | एकाद्याजवळ गुलगुल गोष्टी बोलणें (त्याचें मन वळविण्यासाठीं). | उ० प्रेमचंदाच्या कानांत तूं जपत आहेस, पण सारें फुकट होईल, असें मी तुला आज सांगून ठेवतों ! |
कानांत तेल घालून निजणें | बेफिकीर राहणें, किंवा असणें. | उ० तो कानांत तेल घालून निजला आहे, त्याच्या भरंवशावर तुम्ही राहूं नका ! |
कानाबाहेर किं० कानावेगळा करणें | मनांत न घेणें. | उ० मी त्याची इतकी विनवणी केली, पण व्यर्थ ! त्यानें माझी मागणी कानांबाहेर केली ! |
कानांत सुंठ फुंकणें | एकाद्याला चिथावणें. | उ० कोणीतरी तुझ्या कानांत सुंठ फुंकली आहे खास ! एऱ्हवीं तूं त्या म्हाताऱ्याच्या पाठीस इतका लागला नसतास ! |
कानामागून येणे आणि तिखट होणे | एकाद्याच्या मागून येणे, आणि त्याच्यावर आपला अंमल गाजविण्याला प्रवृत होणें. | |
कानामागे टाकणें | न ऐकणें; झिडकारणें. | उ० मी तुला हिताची गोष्ट सांगत आहे ! माझा उपदेश तूं कानामागें टाकूं नको! |
उजव्या (किं० डाव्या) कानावर पडणें,निजणें,लोळणें | उजव्या (किंवा डाव्या) कुशीवर निजणें इ०; उजवें (किंवा डावें) अंग अंथरुणाला लागेल अशा रीतीनें निजणें इ०. | उ० उजव्या कानावर नीज, म्हणजे तुझ्या डाव्या कानांत औषध घालीन ! |
कानावर मान ठेवणें | आळसानें, किंवा बाफेकीरपणानें, एका अंगावर वळून तक्याला टेकून पडणें,किंवा लोळणें | उ० त्रिविक्रम शेटजीला मी भेटावयाला गेलों, तेव्हां ते कानावर मान ठेवून झोपाळ्यावर आडवे झाले होते. |
कानावर हात ठेवणें | (क) आपणालां कांहीं एक माहिती नाहीं, असें म्हणणें. | उ० राम म्हणे, “कर्णी कर ठेवू ती तरि न दक्षिणा आशा । मज फार दक्षिणेची विप्रा जसि तशिच लागली आशा॥ मोरोपंत-भारती रामायण. |
(ख) न ऐकणें; हेळसांडीवर नेणें; न पथकरणें; अंगावर न घेणें. | उ० मला निरखितां भवच्चरणकन्यका आपगा म्हणे, “अगइ ! ऐकिलेहि न कधीं असे पाप गा ! ” कर श्रवणिं ठेविते, नुघडि नेत्र, घे भीतिला, घालिन भिडेस मी, जरिहि कार्यलोभी, तिला ॥ मोरोपंत-केकावलि. | |
कानांत तुळशी (किं० तुळशीपत्र) घालणें, किं० घालून बसणें. | साधू लोक कानांत तुळशीची पानें घालतात, यावरून पुढील दोन अर्थ निघाले आहेत. | |
(क) प्रपंचांतील लबाडीचे धंदे सोडून देऊन आम्ही साधुत्वाचा मार्ग धरला आहे, असा बाहणा करणें. | ||
(ख) तें ऐकूं येत नाहीं किंवा तिकडे आपलें लक्ष्य नाहीं, किंवा त्याची आपणास पर्वा नाही, असें दर्शविणें. | ||
कानांत बोटें घालणें (किं० कान झाकणें) | (क) एकादी गोष्ट आपणांस माहीत नाहीं असें म्हणणें. | |
(ख) एकादी गोष्ट न पथकरणें. | ||
कानावरून जाणें | (क) कानाला ओझरता स्पर्श करून जाणें. | उ० चोरट्यानें गोफणीनें झोकलेला धोंडा माझ्या कानावरून गेला. |
(ख) ऐकण्यांत येणें. | उ० मुंबईला विहाड, तुळशी, आणि तानसा, येथील पाणी येतें, हें तुझ्या कानावरून तरी गेलें आहे काय ? | |
कानाशीं कान लावणें | गुप्तपणें मसलती करणें. | उ० गोविंदराव आणि लालजी यांनीं कानाशीं कान लावून माझी उचलबांगडी करण्याचा बेत ठरविला । |
कानाशी लावणें किं० कानीं लागणें | एकाद्याला गुप्त गोष्ट सांगण्यासाठीं त्याच्या कानाजवळ आपलें तोंड नेणें; एकाद्याच्या कानाशीं लागणें म्ह० त्याला गुप्त गोष्टी सांगणें, किं० त्याला चाहड्या सांगणें. | उ० तूं लक्ष्मणरावाच्या कानाशीं इतका वेळ लागून त्याला काय सांगत होतास? |
कानाला दडे (किं० दट्टे) बसणें | कान बधिर होऊन त्यांची श्रवण करण्याची शक्त नाहींशीं होणें. | |
कानीं कपाळीं रडणें, किंवा ओरडणे | एकसारखा बोध, उपदेश वगैरे करून वस्तुस्थिति नजरेस आणून देणें. | उ० रोज चार चार तास अभ्यास कर म्हणून मी आज सहा महिने तुझ्या कानीं कपाळीं ओरडत आहे, पण तूं कांहीं माझें ऐकिलें नाहींस ! आतां नापास झालास, तो योग्यच झालास ! |
कानीं कोचीं बसणें किंवा लागणें | कोणाचें संभाषण ऐकण्यासाठीं गुप्त ठिकाणीं म्हणजे कोन्यांत बसणें. | |
कानीं मनीं नसणें | ऐकण्यांत आलेलें नसणें व मनांतही आणलेलें नसणें. ह्याच अर्थी ‘‘ध्यानीं मनीं नसणें” हें अधिक प्रचारांत आहे. | उ० सखूताईच्या मुलीचें लग्न यंदा होईल, ही गोष्ट माझ्या कानीं मनीं सुद्धा नव्हती (म्ह० ऐकण्यांत आली नव्हती व मनांतही आलेली नव्हती.) |
आमच्या कानीं सात बाळ्या | आम्हांला आतां, (म्हणजे यानंतर), कांहीं एक ऐकूं येणार नाहीं, म्हणजे आम्ही ऐकणार नाहीं, किं० आम्हाला ऐकू आलें तरी ऐकलें नाहीं, अशा रीतीनें वागणार ! लहान, मुलांच्या भाषेतील हें एक वाक्य आहे. | |
ह्या कानाचे ह्या (किंवा त्या) कानास कळूं न देणें | अगदीं गुप्त ठेवणें; कोणालाही कळूं न देणें. | उ० ती गोष्ट मजजवळ बोलायाला कचरूं नका. मी या कानाचे त्या कानाला कळूं देणार नाहीं ! |
एकादी गोष्ट ह्या कानानें ऐकणे, आणि ह्या (किंवा त्या) कानानें सोडणें | ती गोष्ट ऐकल्यानंतर तिच्याबद्दल विचार न करणें; ती विसरण्याचा प्रयत्न करणें; ती जणूं ऐकलीच नाहीं अशा रीतीनें वागणें. | उ० कोणी आमच्याजवळ कोणाची निंदा केली, तर ती आम्हीं ह्या कानाने ऐकतों आणि ह्या कानानें सोडून देतों. |
उ० असल्या गोष्टी आम्ही ह्या कानानें ऐकतों आणि त्या कानानें सोडून देतों. |