“मुंडी”

मुंडी – या शब्दाचे अर्थ (क) डोकें (तिरस्कारव्यंजक). “उ० “हा उडवितों तुझी मी बकऱ्याची जेंवि शीघ्रतर मुंडी” । ऐसें बोलुनि देता झाला गुरुपुत्र शीघ्र तरमुंडी ॥६७॥, (ख) संन्यासी. (संन्याशाचे सर्व डोक्यावरचे केश भादरलेले असतात यावरून हा तिरस्कारव्यंजक शब्द प्रचारांत आलेला आहे).

  1. एकाद्याची मुंडी मुरगळणें, पिळणें, पिरगळणें – त्याचा सर्वतोपरी नाश करणें. उ० त्यानें माझ्याविरुद्ध चहाड्या सांगून माझें नुकसान केलें आहे. आतां तो जर माझ्या तावडींत सांपडला, तर त्याची मुंडीच मुरगळून सोडतों !
  2. मुंडी हालविणें किंवा डोलविणें – डोकें हालविणें; [वरिष्ठाच्या म्हणण्यास खुशामत्यानें संमति देण्यासाठीं डोकें हालविलें, किंवा एकाद्या शिष्यानें गुरूचें म्हणणें न समजतां, समजलें आहे असें डोकें हालवून दर्शविलें, म्हणजे “त्यानें मुंडी हालविली, किंवा डोलविली,” असें म्हणतात].
  3. मुंडी फिरविणें – डोकें वळवून नापसंती, किंवा नावड, दाखविणें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!