“बोट”

बोट(क) हाताची किंवा पायाची अंगुलि. 
 (ख) बोटाच्या लांबीचें परिमाण, किं० बोटाच्या रुंदीचें प्रमाण. 
 (ग) बोटाला लागून येईल तितकें.उ० तुपाचें बोट, मधाचें बोट, गंधाचें बोट, कुंकवाचें बोट, इ०.
बोट करणें, बोट दाखविणेंबोटानें एकाद्या पदार्थाचा निर्देश करणें. 
बोटें मोडणें(क) बोटांच्या पेरांचे सांधे सईल करणें. 
 (ख) निर्भर्त्सना करणें; शापणें. 
बोट शिरकणेंएकाद्या कामांत प्रवेश मिळणें. 
बोटावर नाचविणेंआपल्या ताब्यांत ठेवणें; एकाद्या माणसावर ताबा चालविणें.उ० लक्ष्मणरावाला गोविंदराव बोटावर नाचवितो.
ज्याचीं बोटें त्याच्या डोळ्यांत घालणेंत्याच्याच युक्तीनें त्याला पकडणें; त्याची हिकमत त्याच्याच विरुद्ध योजणें किंवा लागूं करणें. 
एकाद्याला दीड बोट, किं० दोन बोटें, स्वर्ग उरणेंतो गर्वानें फुगून जाणें.उ० अन्नपूर्णाबाईच्या नवऱ्याला मामलतदारी मिळाली तेव्हांपासून तिला दीड बोट स्वर्ग उरला आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!