Piracy न करता फ्री ऑफिस सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे | How to download free office software ?

फ्री ऑफिस सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे हे वाचल्यानंतर आपल्या मनात शंका आली असेल कि ह्या ब्लॉग वर चुकीची माहिती दिली जाते. परंतु तसे अजिबात नाही. येथे कुठलीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली जात नाही आणि piracy किंवा copyright चे उलंघन करण्याचा सल्ला दिला जात नाही. आज येथे जी माहिती दिली आहे ती पूर्णपणे वैध आहे.

मी आज येथे आपणाला लिब्रे ऑफिस (Libre Office) या सॉफ्टवेअर बद्दल सांगणार आहे. LibreOffice हे सॉफ्टवेअर एक पूर्ण ऑफिस सॉफ्टवेअर आहे जे Microsoft Office सारखेच आहे. यात सर्व काही कामे करता येतात जे Microsoft Office मध्ये करता येतात . या सॉफ्टवेअर  मध्ये Document तयार करणे, Presentation तयार करणे , Excel शीट बनविणे , इत्यादी कामे सहज व सोप्या मार्गाने करता येतात  

LibreOffice एक शक्तिशाली आणि विनामूल्य ऑफिस सूट आहे जे जगभरातील लाखो लोक वापरतात. हे सॉफ्टवेअर वापरायला ना तुम्हाला पैसे मोजण्याची गरज आहे नाही कोणते लायसेन्स घेण्याची. एव्हडेच नव्हे तर हे सॉफ्टवेअर आपण पर्सनल / व्यक्तिगत वापरासाठी तसेच आपल्या व्यावसायिक कामांसाठी सुद्धा वापरू शकतो.

या office software मध्ये कोणते कोणते विविध घटक आहेत | What are the different components in LibreOffice?

या सॉफ्टवेअर मध्ये खाली दिलेले घटक आहेत.

  1. Spreadsheet: Calc – हे घटक excel शीट्स बनवण्यासाठी वापरले जाते . त्याचे नाव CALC असे आहे
  2. Word processing: Writer – हे घटक documents  बनवण्यासाठी वापरले जाते . त्याचे नाव WRITER असे आहे
  3. Presentations: Impress – हे घटक presentations बनवण्यासाठी वापरले जाते . त्याचे नाव impress असे आहे
  4. Database: Base – हे घटक database बनवण्यासाठी वापरले जाते . त्याचे नाव BASE असे आहे
  5. Math: Formula Editor – हे घटक Math चे formula व इतर कामांसाठी वापरले जाते . त्याचे नाव MATH असे आहे
  6. Draw: Vector Graphics – हे घटक Vector Graphics  बनवण्यासाठी वापरले जाते. त्याचे नाव DRAW असे आहे

All you wanted to know about Open Source | ओपन सोर्स बद्दल सर्व काही

LibreOffice डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करायचे | How to download and Install free software

  1. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा (https://www.libreoffice.org/download/download/)
Pic Credit : Libre Office Website

2. आपण जे Windows ऑपरेटिंग सिस्टिम (३२ बिट किंवा ६४ बिट) वापरात असाल, ते सिलेक्ट करा व download बटण वर क्लिक करा. यामुळे Installer फाईल, Download folder मध्ये डाउनलोड होईल.

3. डाउनलोड केलेले फोल्डर उघडा आणि इंस्टॉलरवर डबल-क्लिक करा.

4. इन्स्टॉलेशन विझार्ड वेलकम डायलॉग बॉक्स दिसेल. इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. “Next >” वर क्लिक करा.

5. दुसरा डायलॉग बॉक्स उघडेल. तुम्‍हाला डिफॉल्‍ट इन्‍स्‍टॉलेशन हवे आहे की नाही, किंवा तुम्‍हाला विशेष ठिकाणी आणि विशिष्ट घटक निवडायचे आहेत की नाही. हे विचारले जाईल. “Typical” निवडा व “Next >” वर क्लिक करा.

6. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल होण्यास तय्यार आहे. “Install” वर क्लिक करा. व काही वेळ शांत बसा.

7. LibreOffice आता आपल्या कॉम्प्युटर वर इन्स्टॉल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!