“टाळी”

टाळी(क) एका तळहातावर दुसरा तळहात मारणें; ही मारण्याची क्रिया, किंवा तिजपासून झालेला आवाज. टीप :–अनुरूप क्रियापदः-वाजविंणे, मारणे, पिटणें, वाजणें. उ०
टाळ्या पिटोनि जन तेथ सुरम्य घोष-
तेव्हां करी; अमित हो सकलांसि तोष ।
वि० वा० भिडे, रा. प., स. ३, श्लो. ६१.
 (ख) गायनाच्या सुरावर हातावर हात मारणें. 
 (ग) सट्टा, किं० व्यवहार, ठरल्याची खूण म्हणून दोन व्यापारी एकमेकांच्या हातावर हात मारतात ती टाळी. 
ब्रह्मांनंदी टाळी लागणेंसच्चिदानंदस्वरूपांत लय होणें.उ०
ब्रह्मानंद लागली टाळी । तेथें कोण देहातें संभाळी ॥
एकदाची टाळी वाजली
एकदाचें लग्न लागलें.  (आतां जुळविलेलें लग्न कोणालाही मोडतां, किंवा फिसकटतां, यावयाचें नाहीं !)
 
टाळीस टाळी देणेंखुशामत करणें; वरिष्ठाच्या मूर्खपणाच्या भाषणास अनुमोदन देणें; होस हो म्हणणें. 
कानावर, किं० कर्णीं, टाळी बसविणेंकानठाळ्या बसविणें; ऐकण्याची शक्ति मोठ्या आवाजानें घालाविणें.उ०
तों गर्जोनि कुरुकटककर्णी बसवी ध्वजस्थ कपि टाळ ॥
                                            मोरोपंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!