छाती | (क) ऊर, वक्षःस्थल. | |
(ख) धैर्य, धारिष्ट, निढळ्या छातीचा, किंवा उरफाट्या काळजाचा म्ह० अतिशय साहसी, धाडसी | टीप :“छाती” आणि ” ऊर” त्या शब्दांचे बरेच वाक्प्रचार सारखे आहेत ते ऊर शब्दाखालीं पहा. त्याशिवाय जे वाक्प्रचार, ते पुढें दिले आहेत. तसेच मागें ले० ९ पहा. | |
छातीचा कोट करणें | येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याचा निश्चय करणें. | टीप :- किल्याची बाहेरची जी भिंत, किंवा गांवाच्या रक्षणार्थ गांवाभोंवतीं बांधलेली जी भिंत, तिला ‘कोट ‘ असे म्हणतात. हा कोट शत्रूचे तडाखे सोसावयासाठी फार भक्कम बांधलेला असतो, ह्यावरून ‘ छातीचा कोट करणें ‘ म्हणजे छाती हेंच स्वशरीराच्या संरक्षणाचें साधन असें म्हणून संकटाला तोंड देण्याचा निर्धार करणें. |
छातीचा व्यापार | (क) ज्या व्यापारांत लवकर माल खपला नाहीं आणि लवकर पैसे हातीं पडले नाहींत तरी चालतें, असा व्यापार. | |
(ख) धोक्याचा व्यापार-प्रसंगविशेषीं ज्यात तोटा होण्याचा संभव आहे असा व्यापार. |