“गाल”

गालमुखाच्या बाजूचे जे दोहींकडील मांसल भाग ते प्रत्येक. उ० ज्या मुलाच्या गालावर खळग्या आहेत तें मूल मला आवडतें.
  उ० ख्रिस्ती धर्माची अशी आज्ञा आहे कीं कोणी एका गालांत मारिलें असतां दुसरा गाल पुढें करावा.
   टीपः-“गाल” ह्या शब्दाने बनलेल्या शब्दसंहतीत ” गालफड ‘ हा शब्द विनोदाने, प्रेमानें, किं० तिरस्काराने, योजण्यांत येतो.
गाल रंगविणेंथोबाडींत मारून एकाद्याचा गाल तांबडा लाल करणें. 
गालांत बसणेंथोबाडींत बसणें.टीपः-“बसणें”  ह्याचा कर्ता  “चपराक ” हा अध्याहृत असतो.
गाल फुगविणेंबढाई मारणें; शेखी मिरविणें; ऐट करणें. 
 गाल बसणेंरोडावणें.उ० तापानें त्याचे गाल बसले.
गालावर गाल चढणें, किं० येणेंसुखासमाधानाच्या राहणीमुळें, किंवा खाणेंपिणे यथास्थित मिळत असल्यामुळें, लठ्ठ होऊन गालाची जाडी वाढणें. उ० हल्लीं त्याची काय चैन विचारावी ? रोज घृतकुल्या आणि मधुकुल्या चालल्या आहेत ! मग त्याचे गालावर गाल कां नाहीं चढणार ?
गालांत हसणें, किं० गालांतल्या गालांत हसणेंमंदस्मित करणें.उ० रुपया दक्षिणा मिळणार हें ऐकून भटजीबोवा गालांतल्या गालांत हसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!