कोरोना कवच पॉलीसी | Corona Kavach Policy

परवडणारी कोरोना व्हायरस विमा पॉलिसी | Cheapest Corona (Covid-19) Policy

Insurance Regulatory Development Authority- (इन्शुरन्स रेगुलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ने आता जनरल व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना गट विमा (ग्रुप इन्शुरन्स) म्हणून “कोरोना कवच” पॉलिसी ऑफर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक खाजगी व सरकारी कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. आता पर्यंत हि पॉलीसी एखादा व्यक्ती स्वतासाठी व त्याच्या कुटुंबियांसाठी विकत घेऊ शकत होता.  परंतु आता कुटुंबातील सदस्यासाठी किंवा इतर ग्रुपसाठीही ही पॉलिसी उपलब्ध होणार आहे.

“कोरोना कवच” पॉलीसी काय आहे ? (What is Corona Kavach Policy – Marathi)
कोरोना कवच पॉलीसी अंतर्गत कोणते आजार कव्हर केले जातात (Which diseases are covered in corona Kavach Policy) ?
कोरोना कवच पॉलीसी कुठे घ्यायची ( Where to buy Corona Kavach Policy? )
कोरोना कवच पॉलीसी चे फायदे (Why to buy Corona Kavach Policy)
सर्वांत स्वस्त कोरोना पॉलीसी कोणती कंपनी देते  ( Cheapest Corona Kavach Policy in the Market)
कोरोना कवच” पॉलीसी मध्ये काय कव्हर केले जाते? (What is covered in Corona Kavach Policy)
कोरोना कवच अंतर्गत कोणत्या बाबी कव्हर होत नाही (What is not covered in Corona Kavach Policy) ?

“कोरोना कवच” पॉलीसी काय आहे ? (What is Corona Kavach Policy – Marathi)

“कोरोना कवच” पॉलिसी ही एक अशी आरोग्य विमा पॉलिसी आहे जी कोरोना (Corona किंवा Covid-19) या आजारामुळे रुग्णालयात  भर्ती व्हावे लागल्यास, त्यामुळे होणाऱ्या रुग्णालयाचा खर्च भागऊ शकते. नाहीतर स्वताच्या savings मधून खर्च करावे लागतात. जास्तीत जास्त लोकांना विम्याचे संरक्षण देणे हे कोरोना कवच पॉलीसीचे उद्दीष्ट आहे, जेणेकरुन आपण या साथीवर एकत्र येऊन एक राष्ट्र म्हणून संघर्ष करू शकू.  कोरोना कवच पॉलीसी साठीचा करार आणि अटी व शर्ती सर्व कंपन्यांमध्ये सारखेच आहेत. त्यामुळे, जी कंपनी सर्वांत कमी Premium मध्ये ही Policy देत असेल, त्या कंपनीची policy घेण्यात काहीच वाईट नाही. या पॉलीसीमुळे, कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण स्वत:ची आर्थिक तयारी करू शकतो.  यात आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबास सुरक्षित करू शकतो.

कोरोना कवच पॉलीसी अंतर्गत कोणते आजार कव्हर केले जातात (Which diseases are covered in Corona Kavach Policy) ?

हि  पॉलीसी फक्त कॉरोना या आजारासाठी तयार केली गेली आहे. आज आपण पाहतो कि भारतामध्ये व इतर देशांमध्ये कोरोना ने थैमान घातले आहे. आजतरी कुठल्याही देश्यात या आजारावर यशस्वी लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. दुर्दैवानें जर कुणाला हा आजार झाला आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले तर तेथे भरपूर खर्च होऊ शकतो . त्यामुळे आपल्याकडे जर इतर कोणतीही पॉलीसी नसेल तर कमीत कमी हि पॉलीसी घेणे गरजेचे आहे

कोरोना कवच पॉलीसी कुठे घ्यायची ( Where to buy Corona Kavach Policy? )

कोरोना कवच पॉलीसी, कोणत्याही जनरल किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा त्यांच्या वेबसाइट वर ऑन लाइन घेऊ शकतो. पॉलीसी ऑनलाईन घेणे ज्यास्त सोपे आहे, त्यामुळे शक्यतो आपण ही पॉलीसी ऑनलाईन घ्यावी. या महामारीच्या  काळात अनेक ऑफिस कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करत आहेत, त्यामुळे ऑफिस मध्ये जाऊन पॉलीसी घेणे वेळखाऊ , धोक्याचे व कठीण होऊ शकते.

कोरोना कवच पॉलीसी चे फायदे (Why to buy Corona Kavach Policy)

कोरोना व्हायरसचा उद्रेक सर्व जगात उद्भवलेल्या अराजक आणि घाबरलेल्या गोष्टींबद्दल फार काही बोलण्याची आवश्यकता नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि अनेक देश थांबले आहेत. आपण सर्व अजूनही या (साथीच्या रोगाविरूद्ध) लढण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे, एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे चांगली आरोग्य विमा पॉलिसीची असणे. कोरोना व्हायरस आणि विशेषत: कोरोना कवच पॉलिसी साठी आरोग्य विमा का महत्वाचा आहे हे जाणून घेऊ इच्छित आहात तर पुढे वाचा!

कोरोना व्हायरस जगभरात फिरणारा प्रवासी असल्याचे सिद्ध झाले आहे. लाखो लोकांमध्ये याचा प्रसार होत आहे.  लॉकडाउन आणि तत्कालीन उपायांनी व्हायरस कमी होण्यास नक्कीच मदत केली. परंतु जसे आपण सर्व लॉकडाउनमधून बाहेर येत आहोत, आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे – की व्हायरस आपल्या अगदी जवळ असु शकतो.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की व्हायरसच्या संपर्कात येऊ नये म्हणून आपल्याला स्वच्छता राखणे आवश्यक आहे आणि सामाजिक अंतराचा सराव करणे आवश्यक आहे. परंतु कोणतीही पद्धत 100% फूल-प्रूफ नाही. खरं तर, CDDEP (सीडीडीईपी) च्या (सेंटर फॉर डिसीज, डायनेमिक्स अँड इकोनॉमिक पॉलिसी) अहवालात असे म्हटले गेले आहे की सप्टेंबर २०२० पर्यंत भारतामध्ये बाधीत झालेल्या लोकांची संख्या अनेक कोटींच्या घरात गेली असू शकते. आणि त्यामुळेच, कोरोना व्हायरस विमा पॉलिसी आपले सर्वात मोठे हत्यार ठरू शकते.

सर्वांत स्वस्त कोरोना पॉलीसी कोणती कंपनी देते  ( Cheapest Corona Kavach Policy in the Market)

माझ्या माहिती प्रमाणे, Furure Generali  हि कंपनी सर्वांत कमी प्रीमियम मध्ये कोरोना कवच पॉलीसी देते.  प्रिमीयम पाहण्यासाठी – https://www.livemint.com/insurance/news/compare-the-premiums-before-buying-a-corona-kavach-policy-11594742105990.html

“कोरोना कवच” पॉलीसी मध्ये काय कव्हर केले जाते? (What is covered in Corona Kavach Policy)

 रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च

कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांवरील उपचार आणि काळजीशी संबंधित 15/30 दिवस रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चांचा समावेश केला जाईल.

इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) साठी लागणार खर्च

दुर्दैवाने, काही कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना आयसीयू अंतर्गत उपचार देखील आवश्यक असतात. विम्याच्या रक्कमेपर्यंतचा खर्च त्यात कव्हर असेल.

रुग्णवाहिका (ऍम्ब्युलन्स) शुल्क

कोविड पॉझिटिव्ह रूग्णाला, रूग्णालयात नेण्यात येईपर्यंत लागणारा रस्ते रूग्णवाहिकेचा  20,00० हजार रुपयांपर्यंत खर्चांचा समावेश केला जाईल. यात एअर किंवा इतर ऍम्ब्युलन्सचा खर्च मिळत  नाही.

“आयुष” उपचार – AYUSH treatment

कोणत्याही शासन अधिकृत आयुष रुग्णालयात कोविड-पॉझिटिव्ह रूग्ण भरती झाल्यास, त्यासाठी लागणाऱ्या उपचारांसाठी होणारा खर्च समाविष्ट असतो.

होमकेअर उपचार खर्च

विमाधारकाच्या आरोग्याच्या तीव्रतेवर अवलंबून, बऱ्याच लोकांना घरी राहून उपचार करावा लागतो. जर डॉक्टरांनी यावर सल्ला दिला असेल तर हे पॉलिसी त्या मुळे होणारा खर्च देते. उदा. औषधे, सल्लामसलत शुल्क, नर्स शुल्क, नाडी ऑक्सिमीटरची किंमत, ऑक्सिजन सिलिंडर इ.

हॉस्पिटल डेली कॅश (केवळ अ‍ॅड-ऑन म्हणून उपलब्ध)

याअंतर्गत, विम्याच्या रकमेच्या 0.5% पर्यंतची तरतूद आहे जी आपल्या गरजा नुसार वापरली जाऊ शकते. त्यात, पॉलीसीत कव्हर न झालेल्या अतिरिक्त खर्चांची पूर्तता करता येते किंवा रुग्णालयात दाखल होण्याच्या कालावधीत मिळणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पूर्तता करता येते.

कोरोना कवच अंतर्गत कोणत्या बाबी कव्हर होत नाही (What is not covered in Corona Kavach Policy) ?

  1. रुग्णालयात 24 तासांपेक्षा कमी दाखल झालेले असल्यास खर्च कव्हर होत नाही.
  2. पॉलिसी सुरू होण्यापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये पॉझीटीव्ह आल्यास त्यांचा समावेश केला जात नाही.
  3. कोणतेही असंबंधित उपचार किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधोपचार कव्हर केले जात नाहीत.
  4. भारताबाहेरील केलेल्या टेस्ट आणि उपचार यात कव्हर केले जात नाहीत.
  5. अधिकृत सरकारी चाचणी केंद्रात न झालेल्या चाचणीचा समावेश केला जाणार नाही.
  6. ओपीडी आणि डे-केअर उपचार लागू नाहीत.

Disclaimer: – The writer of this article is not a Health Expert or Doctor or Medical Professional. This article is purely for giving introductory information for the benefit of people at large.  The user is requested to take due care and information about this policy or any matter related to the policy and should not depend on this article only. Author is not liable for any consequences resulting out of this article or using the information available for any purposes whether directly or indirectly. Some part of the information in this article is translated from the contents available in public domain and is for better understanding of the content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!