“पाऊल”

पाऊल (क) पायाच्या घोट्याखालचा भाग. उ० फार फार चालून माझीं पावलें लटकीं पडूं लागलीं.   (ख) पायाच्या घोट्याखालच्या भागाची ठेवण, ढब, किं० आकारमान. उ० माझ्या पावलाला बरोबर असा जोडा बांधून आण.   (ग) पायाचा तळवा. उ० ऐशिया दुःखें चालतां पंथीं । सुकुमार पाउलें पोळतीं॥फोड उठोनि उले कांती । नखें निघतीं

पुढे वाचा

“नाक”

नाक (क) घ्राणेंद्रिय; नासा किंवा नासिका.     (ख) बटाटा, आलें, धान्याचा दाणा, वगैरेंना ज्या ठिकाणीं मोड फुटतो किंवा नवा अंकुर उत्पन्न होतो, तें ठिकाण.     (ग) सुईच्या माथ्याजवळचें छिद्र, ज्यांत दोरा ओवितात तें.     (घ) एकाद्या देशाचा, किंवा गांवाचा, किंवा संस्थेचा, अग्रगण्य माणूस, किंवा पुढारी. उ० रामपाटील

पुढे वाचा

“नख”

नख. (क) मानवी हाताच्या, किं० पायाच्या, बोटांच्या टोकांना शिंगाच्या जातीचें जें पातळ चकचकीत कवच असतें तें.     (ख) पक्ष्याचा किंवा पशूचा     (ग) खवल्या मांजराच्या अंगावरचा एक एक खवला.     (घ) नखानें येईल, किं० नखावर राहील, इतकें. उ० औषधाचें नख; चुन्याचें नख; कुंकवाचें नख. जेथें नख नको

पुढे वाचा

“दांत”

दांत. (क) चर्वणक्रियेच्या उपयोगीं पडणारे जे तोंडांतील अस्थिविशेष ते प्रत्येक.     (ख) फणीचा, करवतीचा, चक्राचा, नांगराचा, डंगाचा, वगैरे दांत.   त्याचा माझ्यावर दांत आहे माझ्यावर त्याचा रोष आहे. तो माझा द्वेष करतो. मजविषयीं त्याच्या मनांत वैरबुद्धि आहे.   दांत उठणें दांतांनीं धरलेल्या पदार्थावर दांतांचीं चिन्हें (म्ह० खळग्या) उठणें. उ०

पुढे वाचा

“दाढी”

दाढी. तोंडावर, विशेषतः हनुवटीवर, उगवलेले, किंवा उगवणारे केश.   घडी घडी लांब दाढी करणें किंवा मांडणें हरघडीला रागावणें, चरफडणें. (रागावलेला मनुष्य मिशांना पीळ भरतो, किंवा दाढी असल्यास ती गोंजारतो. ह्या लकबीवरून हा वाक्प्रचार उत्पन्न झाला आहे).   दाढी करविणें तोंडावरील केश न्हाव्याकडून तासविणें.   एकाद्याची दाढीहोटी करणें किंवा दाढी धरणें

पुढे वाचा

“दाढ”

दाढ. (क) चावण्याच्या क्रियेला जरूर असे जे मुखांत मागच्या दोन्ही बाजूंस दांत असतात ते प्रत्येक.     (ख) जबडा.   एकाद्याचीं दाढा बांधणें (क) कांहीं मंत्राच्या योगानें अन्न वगैरे खाण्याची त्याची शक्ति नाहींशी करणें. उ० माझें लेंकरू आलीकडे जेवीनासें झालें आहे; जखिणीनें त्याची दाढ बांधली ह्यांत शंका नाहीं!   (ख)

पुढे वाचा

“दंड”

दंड. खांद्यापासून कोपरापर्यंत बाहूचा किंवा भुजाचा भाग.   दंडाला काढण्या लावणें किंवा बांधणें कैद्याच्या दंडाला दोरी बांधणें, (त्याला पकडून नेत असतां).   दंड थोपटणें एका हाताचा दंड दुसऱ्या हातानें ठोकणें (कुस्तीला उभे राहतांना).   दंड थोपटून उभें राहणें किंवा ठाकणें (क) युद्धाची तयारी करून उभें रहाणें.     (ख) वाग्युद्धास

पुढे वाचा

“तोंड”

तोंड (क) अन्न वगैरे द्रव्यें शरीराच्या उपयोगासाठीं ग्रहण करणारें, आणि शब्दोच्चार करणारें, इंद्रिय; मुख.     (ख) चेहेरा. उ० गोविंदा आज तीन दिवस तापानें आजारी आहे, पण त्याच्या तोंडावर अद्यापि आजाण्याची कळा दिसूं लागली नाहीं.   (ग) कोणत्याही वस्तूचा पुढचा भाग, किं० दर्शन. उ० ह्या घराचे तोंड उत्तरेस आहे.  

पुढे वाचा

“ताळू” किंवा “टाळू”

ताळू किं० टाळू       (क) डोक्याचा वरचा भाग.     (ख) मुलाचें जावळ केलें म्हणजे डोक्यावर जो केसांचा झुबका राखून ठेवतात तो.     (ग) तोंडाचा आंतील घुमटाकार भाग.   एकाद्याच्या ताळूवर मिरीं वाटणें (क) त्याला टपका देणें.     (ख) त्याच्यावर पूर्ण अंमल गाजविणें; एकाद्याच्या वरचढ होणें.

पुढे वाचा

“अंग”

अंग – या शब्दाचे अर्थ पुढील प्रमाने आहेत. (क) शरीर, देह. उ० मातीत खेळून तुझे सारें अंग मळून गेलें आहे, चार तपेल्या अंगावर ओतून घेऊन स्वच्छ होऊन ये. (ख) शरीराचा कोणताही अवयव, किं० भाग, किं० इंद्रिय. उ० हात, पाय, वगैरे, ही शरीराची अंगें होत. (ग) बाजू, दिशा, तरफ. उ० माझ्या

पुढे वाचा