Best मराठी ब्लॉग्स | सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग्स | २०२२ मधील सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग्स कोणते आहेत? | Marathi blogs | Best Marathi blogs | What are best Marathi blogs in 2022

 1. https://marathi.momspresso.com/

ह्या ब्लॉगमध्ये अनेक विषय आहेत. विशेषता, महिलांसाठी हा ब्लॉग खुपच माहिती देणारा आहे. बाळन्तपण, बाळ, लहान मुले, सौंदर्य आणि फॅशन ,आइचे आयुश्य, प्रवास आणि रहाणीमान, पाक कृति, आरोग्य व्हिडीओज, १०० शब्दांची गोष्ट, बेस्ट ट्रेंडिंग विषय,
संपादकांची निवड, नवीन प्रायोगिक लेख यामध्ये आहेत. या ब्लॉगमध्ये आपल्याला काही माहिती द्यावी वाटली तर आपण लिहू शकता. त्यासाठी, तुम्हाला आधी लॉगीन बनवावे लागते.

 1. https://dhanlabh.in/

श्री. प्रदीप जोशी, फायनान्स कन्सलटंट, यांनी सुरू केलेला हा ब्लाग “धनलाभ : गुंतवणुकिशी निगडीत प्रत्येक शंकेचे समाधान, मराठीत !”. गुंतवणुकीचे विवीध पर्याय – अल्पबचत योजना, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सिस्टिमॅटिक इनवेस्टमेंट प्लान, सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान, जीवन विमा, करबचत योजना, बाल भविष्य योजना, सेवा निवृत्ती पेंशन योजना, युनिट लिंक्ड इंशुरन्स योजना, म्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ.. अश्या अनेक विषयांबाबत या ब्लॉग मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

 1. https://mutualfundmarathi.com/

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये प्रथम गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष अथवा फोनवर चर्चा करून त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी, ते कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छितात, किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छितात याची चर्चा करतात. तसेच म्युच्युअल फंडातील योजना या बाजाराशी निगडित असल्यामुळे त्यात असणाऱ्या जोखीमीची व मिळणाऱ्या फायदाची संपूर्ण माहिती देतात. यानंतर ग्राहकाच्या उदिष्ठांनुसार त्यांचेसाठी गुंतवणुकीचे नियोजन करून त्याप्रमाणे संरचीत पोर्टफोलिओ बनवतात, त्यातील फायदे तोटे यांची माहिती परत करून आणि त्यानंतर गुंतवणुकीचा सल्ला देऊन गुंतवणूक करण्यासाठी मदत करतात

 1. https://www.vokal.in/

जीवन विषयक सल्ला, राजकारण, UPSC, आरोग्य, पैसे, ज्ञान गंगा, करियर, मनोरंजन, ब्युटी, खाद्यपदार्थ, धर्म अश्या विविध विषयांवर आपण प्रश्न विचारू शकता, तसेच आपणास माहिता असेल तर ती उत्तर म्हणून देउ शकता. या ब्लॉग वर नोंद शोधण्याची सोय आहे. हा ब्लॉग, अन्य भारतीय भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. हिंदी, तमीळ, बांग्ला, कन्नड, तेलगु, गुजराती, मल्याळम, ओडीया, पंजाबी व आसामी भाषांमध्ये नोंदी आहेत.

 1. https://www.uttar.co/

मराठी भाषेची समृद्धी टिकून ठेवणे ह्या तंत्रज्ञानाच्या युगात आव्हानात्मक झाले आहे. इंटरनेट चा वाढता उपयोग पाहता लोकांना मराठी भाषेचा विसर पडू लागला आहे. इंटरनेट वर सर्रास इंग्रजी मध्ये माहिती उपलब्ध असते, मात्र सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये समाजतीलच असे नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणून बरेच लोक इंटरनेट च्या योग्य उपयोगापासून दूर राहतात.

बऱ्याचदा काही लोकांना प्रश्न पडतात, परंतु इंग्रजी चा सराव नसणे किंवा इंग्रजी भाषेचाच न्यूनगंड असणे या कारणाने योग्य माहिती अशा लोकांपर्यंत पोहचत नाही. तसेच अफाट बुद्धिमत्ता असलेले बरेच लोक आपले ज्ञान दुसर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्व व्यक्तींना योग्य व्यासपीठ ‘उत्तर’ वरील प्रश्नोत्तरांनी मिळेल असा आमचा विश्वास आहे. ‘उत्तर’ द्वारे मराठीमध्ये सर्व ज्ञान गोळा करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. जेणेकरून आपली भाषा आणखी समृद्ध होईल, योग्य ज्ञानाचा फायदा योग्य लोकांना होईल आणि मराठी भाषा इंटरनेट च्या या भव्य जाळ्यामध्ये गुंफली जाईल.

 1. http://www.inmarathi.com

हा ब्लॉग मराठी इन्फोटेनमेंट साठी बनलेला आहे. जागतिक कथा ज्या शेअर करण्याजोग्या आहेत, त्या कथआ मराठी भाषेत तयार करतात.

 1. https://www.marathitech.in/

स्मार्ट फोन, अ‍ॅप्स, टेलिकॉम, गेमिंग, विशेष लेख, ऑपरेटिंग सिस्टम, टेक गुरु, बोर्डरूम, शॉपिंग ऑफर या विषयांबद्दल या ब्लॉगमध्ये सविस्तर माहिती मिळते.

 1. https://www.itechmarathi.com/

जॉब , ताज्या बातम्या , टेक न्यूज , स्मार्ट फोन्स , लाईफ स्टाईल असे विविध विषय या ब्लॉगमध्ये आहेत.

 1. https://arthasakshar.com

कोरोना, गुंतवणूक, सावधान, कर्ज, इन्कमटॅक्स, योजना, अर्थसाक्षरता, सर्व लेख, जीवनगाणे, पॉडकास्ट, व्हिडिओ, अर्थविचार असे विविध विषय या ब्लॉगमध्ये आहेत. हा ब्लॉग माहितीने गच्च भरलेला आहे.

 1. https://www.guntavnuk.com/

ह्या ब्लॉगच्या लेखकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी गुंतवणुकीचा अभ्यास जेव्हा सुरु केला तेव्हा असे लक्ष्यात आले, बहुतेक करून गुंतवणुकीची माहिती ही इंग्रजी मधेच उपलब्ध आहे. ज्या व्यक्ती ला चांगल्या प्रकारे इंग्लिश येत नाही, त्याला आर्थिक शिक्षण घेणे फार कठीण काम आहे. म्हणूनच मराठी मध्ये माझे गुंतवणुकीबद्दलचे अनुभव आणि मी शिकलेले धडे मांडण्याचा मी निर्णय घेतला. मी म्युच्युअल फंड , टर्म इन्शुरन्स, हेअल्थ इन्शुरन्स वितरक आहे. तुम्ही माझ्या मार्फत ह्या गोष्टी घेऊ शकता.

4 thoughts on “Best मराठी ब्लॉग्स | सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग्स | २०२२ मधील सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग्स कोणते आहेत? | Marathi blogs | Best Marathi blogs | What are best Marathi blogs in 2022

 1. marathitimeline.com ही सुद्धा मराठीतील टेक्नॉलजी व ब्लॉगिंग संदर्भातील एक उत्तम वेबसाइट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!