“दाढी”

दाढी.तोंडावर, विशेषतः हनुवटीवर, उगवलेले, किंवा उगवणारे केश. 
घडी घडी लांब दाढी करणें किंवा मांडणेंहरघडीला रागावणें, चरफडणें. (रागावलेला मनुष्य मिशांना पीळ भरतो, किंवा दाढी असल्यास ती गोंजारतो. ह्या लकबीवरून हा वाक्प्रचार उत्पन्न झाला आहे). 
दाढी करविणेंतोंडावरील केश न्हाव्याकडून तासविणें. 
एकाद्याची दाढीहोटी करणें किंवा दाढी धरणेंत्याची विनवणी करणें; काकुळतीनें त्याची प्रार्थना करणें. 
एकाद्याची दाढी धरून टाचा किं० पाय तुडविणेंत्याला खुशामतीनें वश करणें; खुशामत करून त्याला फसविणें; मैत्रीचा आविर्भाव करून त्याचा घात करणें. 
दाढी पाहून वाढणेंएकाद्याच्या बाह्य रूपाकडे, किं० पोषाखाकडे, पाहून त्याचें मानपान, किंवा आदरातिथ्य, करणें. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!