Basics of Computers Marathi | कॉम्प्युटरची ओळख मराठीत

संगणक (कॉम्पूटर) म्हणजे काय ?

संगणकाला इंग्रजी भाषेमध्ये कॉम्प्युटर (Computer) म्हणतात. Compute करणे म्हणजे आकडेमोड़ किवा गणना करणे. संगणक प्रत्यक्षात 1930 पासुन चर्चत आहे.  साधारणता १९७० च्या दशकात कॉम्प्युटर चा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठी केला जात असे. यात अनेक सुधारणा होत गेल्या व १९९० च्या काळात संगणकाचा वापर बऱ्याच कामांसाठी केला जाउ लागला. उदा द्यायचे झाले तर, डाटा (माहिती) पाठविणे , डाटा सॉर्टींग, चित्र, ध्वनी ,  अश्या बऱ्याच कामासाठी कॉम्पूटर चा वापर होवू लागला. थोडक्यात सांगायचे झाले, तर कॉम्पूटर हे मानवाने दिलेले Instructions घेणे, त्याप्रमाणे त्यावर वेगाने योग्य ती प्रक्रिया करने व त्याचा आउटपूट (रिझल्ट) देणारे इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.

कॉम्पूटर डाटा कसे मोजतात ?

सर्वांत छोटा डाटा हा एक बीट चा असतो. खरतर एका बीट मध्ये काहीही उपयोगी डाटा ठेउ शकत नाही. पण समजण्या करीता आपण तसे म्हणतो.

१ Bit म्हणजे – एक Binary Digit (1 किंवा 0).  कॉम्पूटर फक्त १ आणि 0 समजतो.

१ Byte म्हणजे – 8 Bits

१ Kilobyte (KB) म्हणजे – 1,024 Bytes

१ Megabyte (MB) म्हणजे – 1,024 Kilobytes

१ Gigabyte (GB) म्हणजे – 1,024 Megabytes

१ Terabyte (TB) म्हणजे – 1,024 Gigabytes

१ Petabyte (PB) म्हणजे – 1,024 Terabytes

१ Exabyte (EB) म्हणजे – 1,024 Petabytes

संगणकाच्या भागाची माहिती मराठी

 • मॉनीटर
 • सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट)
 • की-बोर्ड
 • माऊस
 • स्पीकर्स
 • प्रिंटर

मॉनीटर

मॉनिटर हा संगणक हार्डवेअरचा एक भाग आहे, जो व्हिडिओ कार्डच्या मदतीने संगणकाद्वारे तयार केलेल्या  व्हिडिओ आणि ग्राफिक्सची माहिती प्रदर्शित करतो.

सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट)

कॉम्पूटरच्या रचने मधील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट). याला कॉम्पूटरचा मेंदू सुद्धा म्हणतात . सी.पी.यु. सुक्ष्म इलेक्ट्रानिक components नी बनलेला असतो. Intel Company च्या 7980xe श्रेणीच्या सी.पी.यु. मधे साधारण 700 कोटि ट्रांजिस्टर आहेत.

की-बोर्ड

कीबोर्ड एक इनपुट डिव्हाइस आहे जे कॉम्पूटरमध्ये अक्षरे, नंबर (संख्या) आणि इतर चिन्हे टाईप करण्यास वापरतात. त्याशीवाय आपण कॉम्पूटर वर काहीच काम करू शकत नाही.

माऊस

संगणक माउस हा एक इनपुट डिव्हाइस आहे जो, ग्राफिकल यूजर इंटरफेस – GUI (जीयूआय) मध्ये माउसचे Cursor (कर्सर) नियंत्रित करते.

स्पीकर्स

संगणक स्पीकर एक आउटपुट डिव्हाइस आहे जो आवाज निर्माण करण्यासाठी संगणकाला जोडतो जातो.

प्रिंटर

प्रिंटर एक आउटपुट डिव्हाइस आहे ज्याच्या मदतीने आपण कोणतेही डॉकुमेंट (कागदपत्रे) छापु शकतो. प्रिंटर अनेक प्रकारचे असतात. मुख्यता त्याचे प्रकार खाली दिले आहेत.

 • लेझर प्रिंटर
 • सॉलिड इंक प्रिंटर
 • एलईडी प्रिंटर
 • बिझनेस इंकजेट प्रिंटर
 • होम इंकजेट प्रिंटर
 • मल्टीफंक्शन प्रिंटर
 • डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
 • 3-डी प्रिंटर

One thought on “Basics of Computers Marathi | कॉम्प्युटरची ओळख मराठीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!