All you wanted to know about Open Source | ओपन सोर्स बद्दल सर्व काही

Open सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय | What is Open Source Software

ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) म्हणजे असे सॉफ्टवेअर जे त्यांच्या सोर्स कोड सोबत इतरांना दिले जातात. सोर्स कोड उपलब्ध असल्यामुळे इतर लोक त्या सोर्स कोड चा वापर करू शकतात, त्याच्यात बदल करू शकतात व नंतर इतरांना वापरण्यासाठी देऊ शकतात. सोर्स कोड म्हणजे सॉफ्टवेअर मधील असा भाग आहे जो शक्य तो normal युजर बघत नाही.

सॉफ्टवेअर मधील एखादे कार्य (फंक्शन) व्यवस्थित चालत नसेल तर ज्याच्याकडे सोर्स कोड आहे तो व्यक्ती त्यामध्ये बदल करू शकतो (अर्थात ज्यांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग येते) व ते कार्य ठीक करू शकतो. सॉफ्टवेअर चालते ते त्याच्या मागे असलेल्या सोर्स कोड मुळे. सॉफ्टवेअर मध्ये कुठले फीचर्स हवे किंवा नकोत हे सोर्स कोड मध्ये लिहिले जाते. सोर्स कोड कुठल्यातरी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिले जाते. जसे की C, C++, Java, .Net, Python, Visual Basic. सोर्स कोड मध्ये लिहिल्याप्रमाणे सॉफ्टवेअर आपले कार्य करते. सोर्स कोड लिहिणाऱ्या व्यक्तींना सॉफ्टवेअर प्रोग्रामर असे म्हणतात. तसेच त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर सुद्धा म्हणतात.

ज्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड ओपन (Open) म्हणजेच इतरांना दिसण्यासारखा असतो त्याला ओपन सोर्स सॉफ्टवेअर (OSS) असे म्हणतात.


ओपन source सॉफ्टवेअर चा इतिहास | History of Open Source Software

खरं बघायला गेलं तर 60 च्या दशकात पर्यंत जास्तीत जास्त सॉफ्टवेअर हे फ्री व ओपन सोर्स प्रकारचे असायचे. ज्या लोकांना कम्प्युटरची बेसिक माहिती होती अशा लोकांमध्ये सॉफ्टवेअर शेअर केले जायचे. त्यावेळी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोघेही एकत्रच असायचे म्हणजेच ज्या कंपन्या कॉम्प्युटर्स मध्ये काम करत होत्या त्या सॉफ्टवेअर व हार्डवेअर एकत्रच विकायच्या. सॉफ्टवेअर वेगळे किंवा हार्डवेअर वेगळे अशी कल्पना नव्हती. कॉम्प्युटर म्हटले की हार्डवेअर आणि त्यासोबतच सॉफ्टवेअर. परंतु ही स्थिती 1969 ला बदलली ज्यावेळी, आयबीएम या कंपनीने सॉफ्टवेअर व हार्डवेअर वेगळे करायचे हे ठरवले. त्या वर्षीपासून वापरकर्त्याला सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे वेगवेगळे विकत घेण्याची गरज पडायला लागली. फ्री सॉफ्टवेअर ची संकल्पना 80 च्या दशकातली आहे परंतु ओपन सोर्स ची संकल्पना नव्वदच्या दशकात सुरू झाली.

1973 वर्षी SPICE (Simulation Program with Integrated Circuit Emphasis) नावाचं सॉफ्टवेअर व त्याचा सोर्स कोड हे पब्लिक डोमेन मध्ये त्याचा author डोनाल्ड पीटरसन यांनी टाकला. हे सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन शिकण्यासाठी बनविले गेले होते. अनेक विद्यापीठांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. कालांतराने स्पाइस प्रोग्राम चा उपयोग इंडस्ट्रीमध्ये व्हायला लागला व काही दिवसातच स्टॅंडर्ड सॉफ्टवेअर म्हणून सर्वजण वापरायला लागले.

TeX नावाचे दुसरे सॉफ्टवेअर Donald Knuth यांनी 1978 वर्षी बनविले. Donald Knuth यांनी स्वतःच्या पुस्तकांचे टाईप सेटिंग करण्यासाठी हे सॉफ्टवेअर बनवले होते. एवढेच नव्हे तर त्या सॉफ्टवेअरचे सोर्स कोड डोनाल्ड यांनी public domain मध्ये टाकले. आणि आज पर्यंत टाईप सेटिंग साठी इंडस्ट्री स्टॅंडर्ड म्हणून हे सॉफ्टवेअर वापरले जाते.

आपल्या सर्वांच्या परिचयाचे युनिक्स (Unix) नावाचे ऑपरेटिंग सिस्टम Thompson Ritchie आणि इतरांनी मिळून AT&T Bell Lab येथे 1972 वर्षी बनविले. 1973 पासून युनिक्स हे अनेक विद्यापीठांमध्ये वापरले जाते व त्याचा academic purpose साठी वापर केला जातो.

ओपन सोर्स software कसे काम करतो | How Open Source Software works

ओपन सोर्स सॉफ्टवेअर चे सोर्स कोड हे एखाद्या पब्लिक रेपॉजिटरी मध्ये ठेवले जाते. Public Repository म्हणजे इंटरनेट वरचे एका प्रकारचे स्टोरेज. हे स्टोरेज कुठे आहे ही माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिलेली असते. ही रेपॉजिटरी मधील सोर्स कोड कुणीही मिळवू शकते तसेच त्यामध्ये कुणाला contribute करायचं असेल तर ते करू शकतात.

प्रत्येक ओपन सोर्स सॉफ्टवेअर चे एक Distribution Licence असते. डिस्ट्रीब्यूशन लायसन्स म्हणजे त्या software चा कुठल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो, कुठल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो, त्याला modify केला जाऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्या पद्धतीने ते सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्यूट केले जाऊ शकते.

सर्वाधिक वापरले जाणारे Distribution लायसन्स खालील प्रकारे आहेत.

  1. MIT License.
  2. GNU General Public License (GPL) 2.0
  3. Apache License 2.0
  4. GNU General Public License (GPL) 3.0
  5. BSD License 2.0 (3-clause, New or Revised)

ओपन सोर्स सॉफ्टवेअर चे उदाहरण | Examples of Open Source Software

आज मार्केटमध्ये अनेक ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्यापैकी खाली दिलेले काही महत्त्वाचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स.

  • LibreOffice – LibreOffice हे एक ओपन सोर्स ऑफिस सॉफ्टवेअर आहे – https://www.libreoffice.org/
  • GNU Compiler Collection –

ओपन सोर्स सॉफ्टवेअर बग फ्री असतात का | Are Open Source Software Bug Free

थोडक्यात सांगायचे झाल्यास याचे उत्तर “नाही” असे होय. Open Source सॉफ्टवेअर हेसुद्धा एका प्रकारचे सॉफ्टवेअर असल्यामुळे व ते एखाद्या सॉफ्टवेअर डेव्हलपर ने लिहिल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बग नाहीत असे आपल्याला बिलकुल म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे paid सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा बघत असतात व ते वेळोवेळी सुधारले जातात त्याच प्रमाणे ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा बग असू शकतात व ओपन सोर्स कमुनिटी मधील व्यक्ती ते दुरुस्त करू शकतात.

Open Source Community म्हणजे लोकांचा एक ग्रुप जो एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये रुची दर्शवतो. उदाहरणार्थ अनेक लोकांना मोझिला फायरफॉक्स आवडत असेल तर अशा लोकांचा ग्रुप याला सॉफ्टवेअर कम्युनिटी असे म्हणतात. असे लोक एकत्र येऊन मोझिला फायरफॉक्स वर काम करतात. सॉफ्टवेअर कम्युनिटी मध्ये फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपर असेच असतात असे नव्हे. सॉफ्टवेअर टेस्ट करणारे लोक, सॉफ्टवेअर साठी ग्राफिक्स बनविणारे लोक, सॉफ्टवेअरचा प्रचार करणारे लोक, सॉफ्टवेअरसाठी दान देणारे लोक, अशा अनेक प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. आत्तापर्यंत हे पोस्ट आपण वाचत आलात त्यावरून कळते की आपणही ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये रुची बाळगता. आपल्याकडे जे कौशल्य असेल त्याचा उपयोग आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये करू शकता.

ओपन सोर्स आणि क्लोज सोर्स मध्ये काय फरक आहे | Difference between Open Source and Closed Source

Sr. No.Open Source SoftwareClosed Source Software
01.ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर ज्यांचा सोर्स ओपन आहे. सामान्य व्यक्ति किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर तो सोर्स कोड वापरू शकतोक्लोज सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर ज्याचा सोर्स कोड सर्वांसाठी उपलब्ध नाही
02.ओपन सोर्स सॉफ्टवेअर ला OSS असे ही म्हटले जातेक्लोज सोर्स सॉफ्टवेअर ला CSS असेही म्हटले जाते
03.यामध्ये सोर्स कोड पब्लिक साठी खुला असतोयामध्ये सोर्स कोड कुठेतरी सुरक्षित ठेवला जातो व तो सर्वसामान्यांना उपलब्ध नसतो.
04.यामध्ये इतर वापर करते किंवा संस्था सोर्स कोड ला मॉडिफाय करू शकतातयामध्ये सॉफ्टवेअर ओनर म्हणजे ज्याने सॉफ्टवेअर बनवले आहे त्याच्याकडेच तो सोर्स कोड असतो
05.ओपन सोर्स सॉफ्टवेअर ची किंमत फारच कमी असते. कधी कधीही काहीही नसते. म्हणजे बिलकुल मोफतक्लोज सोर्स सॉफ्टवेअर ची किंमत खूप जास्त असते
06ओपन सोर्स सॉफ्टवेअर अनेक कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करू शकतो. प्रत्येक कम्प्युटर साठी वेगळे लायसन्स घेण्याची गरज नसतेक्लोज सोर्स सॉफ्टवेअर मध्ये शक्यतो एका कम्प्युटर साठी एकच लायसन्स असते
07क्लोज सोर्स सॉफ्टवेअर मध्ये कोणतीही एक व्यक्ती जबाबदार नसतेक्लोज सोर्स सॉफ्टवेअर मध्ये ज्या नेते सॉफ्टवेअर बनवले आहे तो व्यक्ती जबाबदार असतो
08ओपन सोर्स सॉफ्टवेअर चे उदाहरणार म्हणजे मोझिला फायरफॉक्स, ओपन ऑफिस, लिब्रिओफिस, अँड्रॉइड, झिंब्रा, थंडरबर्ड, माय एस क्यू एल, MailMan, Moodleक्लोज सोर्स सॉफ्टवेअर चे उदाहरण म्हणजे स्काईप, गुगल अर्थ, जावा, अडोब फ्लॅश, अडोब रीडर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसोफ्ट विंडोज,

ओपन सोर्स सॉफ्टवेअर चे फायदे आणि तोटे काय | Pros and Cons of using Open Source Software

ओपन सोर्स चे फायदे

1. Open Source सॉफ्टवेअर विनामूल्य आहे.

2. Open Source flexible  आहे; डेव्हलपर कोड कसे कार्य करते याचे परीक्षण करू शकतात आणि त्यांच्या अन्य गरजा अधिक चांगल्या प्रकारे फिट करण्यासाठी software च्या non-functional किंवा issues असणाऱ्या functions  मध्ये बदल करू शकतात.

3. Open Source स्थिर आहे;  Source कोड सार्वजनिकरित्या वितरित केला जातो, त्यामुळे वापरकर्ते त्यांच्या दीर्घकालीन प्रकल्पांसाठी त्यावर अवलंबून राहू शकतात

4. Open Source कल्पकता वाढवतो; प्रोग्रामर, सॉफ्टवेअर सुधारण्यासाठी अस्तित्वात असलेला कोड वापरू शकतात आणि त्यांच्या स्वत: च्या नवकल्पनांसह येऊ शकतात.

5. Open Source नवीन प्रोग्रामरना शिकण्याच्या उत्तम संधी प्रदान करते.

ओपन सोर्स चे तोटे

1. Open Source वापरणे आणि adopt करणे कठीण होऊ शकते.

2. Open Source च्या वापरा मुळे compatibility च्या समस्या निर्माण करू शकतात.

3. Open Source सॉफ्टवेअरमुळे दायित्वाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

4. Open Source वापरकर्त्यांना प्रशिक्षण देणे, डेटा import करणे आणि आवश्यक हार्डवेअर सेट करणे यासाठी अनपेक्षित खर्च येऊ शकतो.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर सुरक्षित असतात का | Are Open Source Software Safe and Secure

फक्त Open Source असणे ही सुरक्षिततेची हमी नाही. परंतु open source software चा  वापर अधिक होत चालला आहे. काही घटना अश्या घडल्या आहेत ज्यामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर च्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे . परंतु तोच प्रश्न क्लोज सोर्स सॉफ्टवेअर बाबत पण आहेच. हे असले तरी ओपन सोर्स सॉफ्टवेअर सुरक्षित असण्याचे कारण खाली दिले आहेत.

1. ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये अनेक लोक काम करत असल्यामुळे त्यातील प्रॉब्लेम शोधून काढणे सुद्धा सोपे आहे व त्या प्रॉब्लेम चा सोलुशन सुद्धा देणे सोपे होते

2. ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये बदल लवकर लवकर होत असतात व त्यांचे पॅचेस अधिक प्रमाणात काढले जातात. त्यामुळे प्रॉब्लेम सापडला कि लोक त्यावर काम करायला लगेच सुरु करतात व लवकरात लवकर त्याचा प्रश्न मार्गी लावतात.

Piracy न करता फ्री ऑफिस सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे | How to download free office software ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!