टोमण्याचे अभंग

मुर्खाशी बोलतां कोण सुख चित्ता। म्हणोनी वार्ता सांडावी ते ॥१॥ आपुल्या आनंदी असावें सर्वदा । करावी गोविंदासवें मात ॥ २॥ उचलोनी धोंडा पाडावा चरणीं । तैसी मात जनीं घडों नये ॥३॥ बहिणी म्हणे सदा दावा या दोघांसी। आहे परमार्थासी प्रपंचाचा ॥४॥ जयासी स्वहित करणें असे मनीं । तेणें द्यावी जनीं

पुढे वाचा

आरती चंद्राची.

प्रकाश निर्मल कोमल कमलोद्भव । देखुनि रमला तेथें भ्रमराचा भाव । ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव । अनुभव सिद्धा देतो मुक्तीचा ठाव ॥१॥ जयदेव जयदेव जय रजनीकांता। दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा ॥ध्रु.॥ प्रतिमासा अंती द्वितिया येती जन्माची । राका येता प्रतिमा पूर्ण बिंबाची । चतु र्थीची पूजा भाविक भक्ताची । गोपाळातें

पुढे वाचा

आरती श्रीकृष्णाची.

जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा । देवकीसुत नामोचित यादवकुलगात्रा ॥ध्रु०॥ लौकिक वचने वदती श्रीपति हा येउनी। द्वारे जन्मत अरयुत देखियला नयनीं। परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी । जाणति सज्जन विरहित जन्मांतर योनी। अंबरुषीच्या गर्भालागुनि अवतारी । बळिरामचि हा झाला रोहिणिच्या उदरीं । तूं तंव योनीसंभव न होसी निर्धारीं । धन्य तव रूप

पुढे वाचा

आरती तुळसीची.

वृंदावनभुवनीं तुळसीचें वन । तेथें क्रीडा करी स्वयें श्रीकृष्ण । रात्रंदिस तुळसीचें ध्यान । सत्यभामा नारी करिते पुजन ॥१॥ जयदेवी जयदेवी जय तुळसी सुंदरी । अखंड विष्णु तुज निजमस्तकी धरी ॥ध्रु०॥ सहज सांवळा कृष्ण हा बरवा। कंठों शोमती तुळसीच्या माळा । वृंदावनभुवनी गोपिका सकळा । तुळसीपूजन करिती बाळा वेल्हाळा ॥२॥

पुढे वाचा