शैक्षणिक पुस्तकांचे सर्च इंजिन | A search engine where you get old resources and educational books

मित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहितीही असेल. परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त  ठरू शकते.  अनेक वेळा ऑनलाइन पुस्तक शोधतांना  असे जाणवते की जे पुस्तक आपणास हवे आहे ते गुगल वरून सहजा सहजी  व लवकर  सापडत नाही.

हा अनेकांचा प्रश्न काही अंश सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला आहे. आज आपण नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (National Digital Library of India) याबाबत जाणून घेणार आहोत. डिजिटल लायब्ररी बद्दल आपण ऐकले असेल .परंतु अशी लायब्ररी जिथे मराठी पुस्तके सुद्धा मिळतात अश्या फारश्या लायब्ररी नाहीत. Digital Library चे अनेक फायदे आहेत.

नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही एक वेबसाइट (https://ndl.iitkgp.ac.in/) असली तरी सुद्धा त्याला आपण सर्च इंजिन प्रमाणे वापरू शकतो.  हे सर्च इंजिन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर यांनी भारत सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयांतर्गत तयार केले आहे.

या ठिकाणी आपणा सर्वांसाठी, प्राथमिक ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध केलेले आहे. अगदी जुन्या पुस्तकं पासून ते आत्तापर्यंतच्या नवीन पुस्तकांत पर्यंतचे सर्व पुस्तके येथे मिळू शकतात.

(Source : https://ndl.iitkgp.ac.in/)

ही वेबसाइट म्हणजे, अनेक लेखकांनी लिहिलेल्या असंख्य शैक्षणिक साहित्याचा मोठा संग्रह आहे. येथे सर्व प्रकारची पुस्तके, ऑडिओ बुक्स, लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स, लेक्चर प्रेसेंटेशन्स, नोट्स, सिमुलेशन प्रश्नपत्रिका, सोल्युशन्स इत्यादी उपलब्ध केले आहे. तंत्रज्ञान, सामाजिक, विज्ञान, साहित्य, कायदा, वैद्यकीय इत्यादी सर्व विषयांसाठी शैक्षणिक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे.

एवढेच नव्हे तर सर्व भाषांमधील सामग्री येथे उपलब्ध केली आहे. येथे, आठ करोड हून अधिक पुस्तके व इतर समृद्ध सामग्रीचा समावेश केला आहे. हे सर्च इंजिन वापरणेही अगदी सहज व सोपे केले आहे. अगदी गूगल सर्च इंजिन प्रमाणे. येथील पुस्तके मिळविण्यासाठी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्स चा वापर करता येईल. मोबाईल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम वर चालते.

एका अर्थाने,  ही एक मोठी लायब्ररी आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या संस्थात्मक डिजिटल भांडारांमधील सामग्री एकत्रित केली आहे. या लायब्ररीचा आपण सर्वांनीच भरपूर फायदा घेतला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
error: Content is protected !!