आरती तुळसीची.

वृंदावनभुवनी तुळसीचें वन ।

तेथें क्रीडा करी स्वयें श्रीकृष्ण ।

रात्रंदिस तुळसीचें ध्यान ।

सत्यभामा नारी करिते पुजन ॥१॥

जयदेवी जयदेवी जय तुळसी सुंदरी ।

अखंड विष्णु तुज निजमस्तकी धरी ॥ध्रु०॥

सहज सांवळा कृष्ण हा बरवा।

कंठों शोमती तुळसीच्या माळा ।

वृंदावनभुवनी गोपिका सकळा ।

तुळसीपूजन करिती बाळा वेल्हाळा ॥२॥

कार्तिक मासी तुळसीची भाक्त ।

राधादामोदर बूंदावनी येती ।

शंख चक्र गदा पनें काढिती ।

लावुनि उत्तम दीप पंचारति करिती ॥३॥

उठोनियां प्रातःकाळी करिती स्मरण ।

श्रीकृष्णहृदयीं तुळसीचें ध्यान ।

त्याची भाक्ति करी बहिणी आपण ।

द्यावें प्रेमभावे मज मूढा ज्ञान ॥ ४ ॥

संत बहिणाबाईची गाथा – शंकर नरहर जोशी (संपा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *