आरती चंद्राची.

प्रकाश निर्मल कोमल कमलोद्भव ।

देखुनि रमला तेथें भ्रमराचा भाव ।

ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव ।

अनुभव सिद्धा देतो मुक्तीचा ठाव ॥१॥

जयदेव जयदेव जय रजनीकांता।

दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा ॥ध्रु.॥

प्रतिमासा अंती द्वितिया येती जन्माची ।

राका येता प्रतिमा पूर्ण बिंबाची ।

चतु र्थीची पूजा भाविक भक्ताची ।

गोपाळातें छाया करिसी कृपेची ॥ जय० ॥२॥

नव रत्नाहूनी रत्न शास्त्राचा विवेक ।

उपमे तुजसी तुळिता तुझा तूंचि एक ।

शिवमोळीचे भूषण लुब्ध चातक ।

भक्ती भजता सिद्ध साधी पद पहिला पदक ॥३॥ (अपूर्ण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *