बगल | (क) खाक; खांद्याखालचा भाग. | |
(ख) आंगरखा, बंडी, वगैरेंच्या बाहीला जो चौकोनी तुकडा शिवलेला असतो तो. बायकांच्या चोळीला असाच तुकडा असतो तो त्रिकोणाकृति असतो, आणि त्याला कोर असें म्हणतात. (कोर स्त्रीलिंगी). | ||
(ग) लंगड्या मनुष्याची कुबडी. | ||
(घ) बाजू. | ||
एकादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करून येणें | ती वस्तु आपल्या खिजगणतींत नाहीं असें धरून वागणें. | |
एकादी वस्तु बगलेंत मारणें | छाती आणि बाहु यांच्यामध्यें ती दाबून धरणें; खाकोटीला मारणें. | |
एकाद्याच्या बगलेंत असणें | त्याच्या संरक्षणाखालीं असणें; त्याच्या वशील्याचा असणें; त्याचा अंकित असणें. | उ० जो कोणा तरी थोर माणसाच्या बगलेंत असेल, त्याला सारे लोक नमून असतात. |
तें काम त्याच्या बगलेंतलें आहे | तें त्याला सहज करता येण्याजोगें आहे. | |
बगल, किं० बगला, वर करणें | आपल्याजवळ कांहीं नाहीं, किं० कोणी शोधीत असलेली विशिष्ट वस्तु नाहीं, असें सिद्ध करण्यासाठीं बाहु वर करून दाखविणें; आपणाजवळ कांहीं नाहीं असें म्हणणें. | |
बगलेंतून एकादी गोष्ट काढणें | एकादी खोटी गोष्ट बनवून ती खरी म्हणून सांगणें; बात झोंकणें. |
%d bloggers like this: