“शेंडी” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) डोक्याची हजामत करवून, किंवा जावळ करवून, मध्यें जो केशांचा झुबका राखून ठेवलेला असतो तो; हिंदुत्वाची खूण. हळुं हळुं झडो अहंता, सन्नमनीं वार्द्धकीं जशी शेंडी । केंडूं विवेक विषया, निस्पृह जन वस्तुतें जसा केंडी ॥ —मोरोपंत.” (ख) मोर, कोंबडा,
पुढे वाचाAll Information and Knowledge in Marathi
हा ब्लॉग मराठी भाषेत माहिती प्रकाशित करण्यासाठी आहे. संगणक, इंटरनेट, सरकारी नौकरी, गुंतवणूक व विमा, सामान्य ज्ञान विषय समाविष्ट आहेत. This blog is about publishing information in Marathi Language. Topics include Computer, Internet, Marathi Language Adages and Provers, Government Jobs , Insurance and Investments and General Knowledge.
कोणत्याही वस्तूचा माथा. उदा. झाडाचें, डोंगराचें, घराचें, वगैरे ला “शिर” म्हणतात
“शिर” या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. ते अर्थ पुढे दिले आहेत. (क) डोकें. (ख) कोणत्याही वस्तूचा माथा. उदा. झाडाचें, डोंगराचें, घराचें, वगैरे शिर. (ग) सैन्याची आघाडी. (घ) (घोड्यांची गणति करतांना) व्यक्ति. उदा. घोडा शिर चार; (म्हणजे चार घोडे). शिर सुरी तुझ्या हातीं – माझें डोकें तुझ्या ताब्यांत आहे, आणि सुरीही
पुढे वाचा“मुंडी”
मुंडी – या शब्दाचे अर्थ (क) डोकें (तिरस्कारव्यंजक). “उ० “हा उडवितों तुझी मी बकऱ्याची जेंवि शीघ्रतर मुंडी” । ऐसें बोलुनि देता झाला गुरुपुत्र शीघ्र तरमुंडी ॥६७॥, (ख) संन्यासी. (संन्याशाचे सर्व डोक्यावरचे केश भादरलेले असतात यावरून हा तिरस्कारव्यंजक शब्द प्रचारांत आलेला आहे). एकाद्याची मुंडी मुरगळणें, पिळणें, पिरगळणें – त्याचा सर्वतोपरी नाश
पुढे वाचामुठींत असणें – पूर्ण कह्यांत, ताब्यांत, असणें. उदा. नारायणराव पूर्णपणें त्या सावकाराच्या मुठींत आहे. म्हणून तुम्ही नारायणरावास वळविण्यासाठीं त्या सावकाराशीं संधान बांधा.
मूठ – या शब्दाचे अर्थ (क) हाताचीं बोटें तळहातावर वळवून टेकिलीं असतां हाताच्या पंजाचा जो आकार होतो तो. (ख) वरच्याप्रमाणें मूठ मिटली असतां तिच्यांत ज्या परिमाणाचा पदार्थ राहूं शकेल तें परिमाण, किंवा मुठींत जितका पदार्थ राहूं शकेल तितका पदार्थ (धान्य वगैरे). उ० भाताच्या रोपांची मूठ, कोथिंबिरीची मूठ, इ० (ग) मंत्रानें
पुढे वाचा“मिशा”
मिशा – या शब्दाचे अर्थ – (क) पुरुषांच्या वरच्या ओठावरील केशांची पंक्ति. (ख) मांजराच्या, झुरळाच्या, तोंडावरचे लांब लांब केश. 1. एकाद्याच्या मिशा खालावणें – त्याची फजीती होणें, त्याचा नक्षा, तोरा, उतरणें. [येथे “खालावणें” हे अकर्मक क्रियापद]. 2. एकाद्याच्या मिशा खालाविणें – त्याची फजीती करणें; त्याचा तोरा कमी करणें. 3. एकाद्याच्या
पुढे वाचामनगटासारखें मनगट पाहून कन्या द्यावी व इतर “मनगट” शब्दापासुन सुरू होणाऱ्या म्हणी
मनगट – (क) हाताच्या पंज्याचा बाहूशीं जो सांधा तो. (ख) घोडा, गाढव, वगैर जनावरांचीं मूठ; (म्हणजे खुराजवळचा सांधा). (ग) (शक्ति, सामर्थ्य, वगैरेचें अधिष्ठान, ह्या दृष्टीनें) अंग. उ० तुझ्या मनगटांत जोर असला तर घे हें काम अंगावर स्वतः! (म्हणजे तुझे ठायीं किंवा अंगीं). एकाद्याचें मनगट धरणें – एकाद्या अपराधांत त्याला पकडणें;
पुढे वाचा“मन”
मन (क) सुखदुःखादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. (ख) संकल्पादिरूप मनाची वृत्ति. (ग) सदसद्विवेकबुद्धि. उ० तुझ्या मनाला जर तें योग्य दिसत असलें तर कर. ज्याचें मन त्याला ग्वाही देतें आपण केलेलें कोणतेंही कृत्य योग्य आहे कीं अयोग्य आहे, खरें आहे कीं खोटें आहे, चांगलें आहें कीं वाईट
पुढे वाचा“बोट”
बोट (क) हाताची किंवा पायाची अंगुलि. (ख) बोटाच्या लांबीचें परिमाण, किं० बोटाच्या रुंदीचें प्रमाण. (ग) बोटाला लागून येईल तितकें. उ० तुपाचें बोट, मधाचें बोट, गंधाचें बोट, कुंकवाचें बोट, इ०. बोट करणें, बोट दाखविणें बोटानें एकाद्या पदार्थाचा निर्देश करणें. बोटें मोडणें (क) बोटांच्या पेरांचे सांधे सईल
पुढे वाचा“बगल”
बगल (क) खाक; खांद्याखालचा भाग. (ख) आंगरखा, बंडी, वगैरेंच्या बाहीला जो चौकोनी तुकडा शिवलेला असतो तो. बायकांच्या चोळीला असाच तुकडा असतो तो त्रिकोणाकृति असतो, आणि त्याला कोर असें म्हणतात. (कोर स्त्रीलिंगी). (ग) लंगड्या मनुष्याची कुबडी. (घ) बाजू. एकादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान
पुढे वाचा