कपाळ | (क) भिवयांच्या वरचा व मस्तकाच्या खालचा जो प्रदेश तो. | |
(ख) नशीब, दैव, पूर्वकर्माचा परिपाक. | उ० पुत्राचे सुख माझ्या कपाळीं नाहीं. | |
कपाळ उठणें कि० चढणें | त्रास, पीडा, किं०उपद्रव होणें. | |
कपाळ काढणें | वैभवास चढणें. | उ० ह्या मुलाच्या विद्येला पैसा खर्च करावयास तुम्ही कचरूं नका. तो चांगलें कपाळ काढील, असा मला रंग दिसत आहे. याच अर्थाने ‘ नशीब काढणें ‘ असाही वाक्प्रचार आहे. |
एखाद्यावर कपाळ टेकणें | त्याच्यावर भरवंसा किं० भिस्त ठेवून असणें. | |
कपाळ धुवून पाहणें | नशीबी काय आहे तें पाहणें. | |
एकाद्याचें कपाळ फुटणें | त्याच्यावर दुर्दैव ओढवणें. | उ० त्या बाईनें नवऱ्यासाठी किती पैसे खर्चिले ! किती नवस केले ! पण कांहीं उपयोग झाला नाहीं. शेवटी तिचे कपाळ फुटलें ! (म्हणजे तिचा नवरा मेला). |
कपाळाचें कातडें नेणें | दुर्दैवी स्थितींत पाडणें. विपत्तींत लोटणें. | |
एकाद्याच्या कपाळाची रेषा उघडणें (किं० उपटणें) | त्याला अकल्पित रीतीनें सुदैव प्राप्त होणें. | |
कपाळाला केस उगवणें | अशक्य गोष्ट घडणें. | उ० तो रामा पास झाला काय ? कपाळाला केस उगवले असेंच म्हटलें पाहिजे ! |
कपाळावर हात मारणें | आश्चर्य, दुःख वगैरे भावनांनीं कपाळावर हातानें ताडन करणें; नशिबास दोष लावणें. | |
एकाद्याच्या कपाळाशीं कपाळ घासणें | त्याच्याशीं सहवास करणे; त्याच्या संगतीत राहणें; त्याच्या कच्छपीं असणें. | |
एकाद्याच्या कपाळाला अपकीर्ति, अपयश, दारिद्य इ० येणें | त्याच्या भोगाला अपकीर्ति, इ० येणें. | |
एकाद्याच्या कपाळीं डाग लागणें | त्याची बेअब्रू , फजिती होणें |
%d bloggers like this: