“काळीज”

काळीज.हृदय. देहातील अत्यंत नाजूक भाग, मर्मस्थानउ० भेदोनि काळिजाला गेला लोकापवादशर इ०
                             मोरोपंत-भारती रामायण.
 काळीज उडून जाणें, कांपणे, थरथरणें, धडकणेंभीतीनें वगैरे छाती उडूं लागणें. 
त्याच्यापुढें काळीज काढून टाकलें तरी त्याला विश्वास येणार नाहींकोणत्याही प्रकारांनीं त्याची खात्री पटणार नाहीं. 
काळीज काढून देणेंआपली आवडती वस्तु देणें. 
एकाद्याचें काळीज खाणेंत्याला फार उपद्रव देणें, किं० दुःख देणें. 
मी बोलूं नये तें बोललों म्हणून माझे काळीज मला खात आहेजें मी बोललों त्याबद्दल मला फार पश्चाताप होत आहे. 
त्याचें काळीज पाठीमागें आहे, किं० त्यानें काळीज पाठीमागें टाकलें आहेत्याला कशाचीच भीति किंवा परवा वाटत नाहीं. 
काळीज फुटणेंदुःखानें, भीतीनें, आश्चर्यानें, वगैरे छातीत धक्का बसणें. 
एकाद्याचें काळीज फोडणेंमर्मभेदक शब्द बोलून त्याचे हृदयास दुःख देणें. 
काळजानें धीर सोडणें, काळजानें ठाव सोडणें, काळजाला भोक पडणेंअत्यंत दुःखग्रस्त, भीतिग्रस्त, किं० आश्चर्यचकित होणें. 
काळजाला घरें पडणें (किं० पाडणें) हृदयाला झोंबणें किं० दुःखदायक होणें (किं० करणें). उ० नाना-आपले हे शब्द काळजाला कसे घरे पाडतात तें काय सांगूं ?                                                                                                             तोतयाचे बंड-न. चिं. केळकर.
काळजाचें पाणी होणेंदुःखग्रस्त, नष्टधैर्य, हतोत्साह होणें. 
काळीज फाटणें, काळीज दो जागा होणें-भीतीनें किं० दुःखानें अत्यंत ग्रस्त होणें. 
काळजाला फेस येणेंएकाद्या कामीं फार परिश्रम करून अगदीं थकून जाणें. 
 एकाद्याच्या काळजावर घाव घालणें (किं० डाग देणें)त्याला अत्यंत दुःख देणें; त्याच्या मर्मावर आघात करणें. 
काळजाला लागणें, भिनणें, किं० झोंबणेंमर्मस्थानापर्यंत जाऊन पोंचणें. अत्यंत क्लेशदायक होणें. खोल जाणें. आंत भिनणें, हृदयाला झोंबणें. 
सात काळजांच्या पलीकडे ठेवणें फार फार जपणें. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *