गळा. | ||
(क) मानेच्या पुढचा भाग; डोकें आणि छाती यांच्या मधला भाग. | ||
(ख) घसा. | ||
(ग) गाण्यांतील आवाजी. | उ० त्या गवयाचा गळा मधुर आहे. | |
(घ) घागरीचा, तांब्याचा, वगैरे गळ्याच्या आकाराचा भाग. | ||
गळा धरणें | (क) घशामध्यें विकृति, आजार, वगैरे उत्पन्न होणें. (धरणें अकर्मक). | उ० त्वद्गुणकीर्तन करितां लज्जा हे पापिणी धरूं न गळा । हे ताटकांतका ! हा परमार्थ हिणेचि बुडावला सगळा ॥ मोरोपंत-आर्या केकावलि. |
(ख) शब्दोच्चाराला, किंवा खाण्याला, हरकत करणें (धरणे सकर्मक). | ||
केसानें गळा कापणें | विश्वासघात करणें; गोड गोड बोलून, आपलेपणा दाखवून, किंवा प्रेम दाखवून, हळूंच एकाद्याचा घात करणें. | |
गळा गुंतणे किं० अडकणें | अडचणींत, पेंचांत सांपडणें. | |
गळा गोवणें | एकाद्याला वचनांत, किं० पेंचांत, अडकावणें;संकटांत घालणें. | |
गळा दाटणें किं० दाटून येणें | शोकानें कंठ भरून येणें; दुःखानें किं० प्रेमानें कंठ सद्गदित होणें. | उ० दुर्योधन राजाचा मज पाहुनि दीन बहु गळा दाटे। मोरोपंत-शल्यपर्व, अ. ३; आर्या ६०. |
गळा पडणें किं० बसणें किं० फुटणें | फार बोलून किंवा गाऊन, घसा घोगरा होणें. | |
गळा फुटणें | मुलगा प्रौढ दशेंत येऊं लागला म्हणजे त्याच्या आवाजाचा नाजूकपणा नाहींसा होऊन आवाज प्रौढ आणि भारदस्त होणें; पोपट वगैरे पक्ष्यांचा शब्दोच्चार स्पष्ट होणें. | |
गळा पिंजणें | कंठांतून दुहेरी उच्चार निघूं लागले ……………… पडल्यामुळें घसा नाजूक होणें, किं० सोलून निघणें. | |
गळां बांधणें, किं० गळी बांधणें, किं० गळ्यांत बांधणें | (क) वस्तु एकाद्याला पथकरावयास भाग पाडणें. उ० ही म्हैस तात्यानें माझ्या गळ्यांत बांधली. | |
(ख) एकाद्याच्या माथीं विनाकारण दोष बसविणें. | उ० पेापट उडून गेल्याचा दोष तुम्ही उगीच माझ्या गळ्यांत बांधतां ! | |
गळा भरून येणें, गळा दाटून येणें | (क) प्रेमादि मनोविकारांनीं कंठ सद्गदित होणें. | |
(ख) कफादिकांनी गळा कोंदणें. | ||
गळा लागणें | गायनांत सूर किं० आवाजी यथाशास्त्र होऊं लागणे. | |
गळा सोडविणें | (क) एकाद्याचा गळा कापणें. | |
(ख) पेंचांतून, किंवा संकटांतून, एकाद्यास मुक्त करणें. | ||
गळी पडणें किं० गळीं लागणें | (क) एकाद्याला आलिंगणें. | |
(ख) एकाद्याला फार फार भीड घालणें, किं, प्रार्थिणें. | ||
(ग) अमुक गोष्ट तूंच केलीस असे विनाकारण एकाद्यास म्हणणें; एकाद्याच्या माथीं उगीचच्या उगीच दोष मारणें किं० लादणें | ||
(घ) एकाद्यावर शिव्यांचा वर्षाव करणें. | ||
(ङ) एकाद्यावर भारभूत होऊन राहाणें. | ||
(च) एकाद्याला जडणें. | उ० तें व्यसन माझ्या गळीं पडलें. | |
गळी लागणें | (क) एकाद्याला भार होणें. | उ० मुलगी गळीं लागली आहे; तिला हें तेरावें वर्ष. |
(ख) आरडाओरडा करणें. | उ० असा काय गळीं लागतोस? जरा हळू बोल! | |
गळ्याखालीं उतरणें | (क) (शब्दशः) घशांतून खालीं जाणें. | उ० घांस अडकला होता तो गळ्याखालीं उतरला. |
(ख) स्वाधीन होणें; पदरात पडणें. | उ० न्यायाधीशानें लांच खाऊन माझ्या दावेदारासारखा निकाल दिला; पण मी तो लांच न्यायाधीशाच्या गळ्याखाली उतरू देणार नाहीं, (म्ह० त्याला पचूं देणार नाहीं). | |
तुला माझ्या गळ्याची शपथ आहे | माझा गळा न तुटावा असें तुला वाटत असेल, तर तूं हें काम करावें (आग्रह दाखविण्यासाठीं ह्याचा उपयोग करतात). | |
गळ्यांत असणें | एकाद्यावर अवलंबून असणें; एकाद्यानें केलेंच पाहिजे असें काम असणें. | उ० माझ्या गळ्यांत सध्यां पुष्कळ कामें आहेत; तुझें काम मला पथकरतां येणार नाहीं. |
गळ्यांत गोणी येणें | (क) एकादें संकट टाळावयासाठीं केलेल्या प्रयत्नानें तें संकट जास्तीच त्रासदायक होणें. [ हा वाक्प्रचार ओझ्याच्या बैलाच्या वतनावरून रूढ झालेला आहे. पाठीवरची गोणी झुगारून देण्यासाठीं बैल धडपड करतो, पण तेणेंकरून गोणी खालीं न पडतां घसरून मानेवर येते, आणि गोणीचें ओझें मानेवर पडून मानच जमिनीस खिळून रहाते, आणि बैलाचा श्वासोच्छ्वास कष्टाने चालतो. बैलाच्या ह्या स्थितीवरून ‘गळ्यांत गोणी येणें, ‘ हा वाक्प्रचार उत्पन्न झाला आहे.] | |
(ख) संकट ओढवणें. | ||
गळ्यांत पाय येणें | अडचणींत, पेंचांत, सांपडणें. | उ० त्याचे पाय त्याच्या गळ्यांत आले.ह्याच अर्थानें “त्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यांत आल्या,” असेंही म्हणतात. |
गळ्यांत माळ घालणें | (क) वरणें (स्त्रीने पति म्हणून पुरुषास, किं० पुरुषानें पत्नी म्हणून स्त्रीस, यथाविधि पथकरणें.) | |
(ख) एकाद्यावर कांहीं काम सोपविणें. | उ० लोकांनीं अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यांत घातली. | |
गळ्यांत येणें | एकादी अडचण येऊन ……… चांगल्या उद्देशाने एकादें काम करीत असतां त्याचा अगदीं अनिष्ट परिणाम होऊन पंचाईत होंणें. | |
गळ्यांत घोंगडें येणें | एकाद्यावर कांहीं तरी लचांड येणें; इच्छा नसतां एकादी गोष्ट करण्याचा, किं० पथकरण्याचा, प्रसंग येणें. | |
मुलगी गळ्याशीं (गळीं) लागली आहे | लग्नाला योग्य होऊन गेली आहे. (मागें गळीं लागणें पहा). | |
गळ्यांत हात घालणें | दादा बाबा करणें; एकाद्याची मर्जी सुप्रसन्न व्हावी म्हणून प्रेम दाखविणें. | |
गळ्यांत गळा आणि नळ्यांत नळा | निकट मैत्री, घट्ट दोस्ती. | उ० आलीकडे रंगोपंत आणि सदूभाऊ ह्यांचा गळ्यांत गळा असतो ! |
गळ्यांत पडणें | हिताहिताची, रक्षणाची, पोसण्याची, बजावण्याची, निस्तरण्याची, वगैरे जबाबदारी येणें. | उ० माझी बहीण मेल्यापासून तिची मुले माझ्या गळ्यांत पडली आहेत. |
उ० रामभाऊ मेल्यापासून त्याची बायको दिराच्या गळ्यांत पडली. | ||
उ० हेडक्लार्क रजेवर गेल्यापासून पगारआकारणीचें बिल माझ्या गळ्यांत पडलें. | ||
गळ्यांत धोंड पडणें | नावडतें, किं० कठिण, काम करण्याचें ओझें येणें. | उ० ह्या चाळीचें भाडें वसूल करण्याला मी अगदीं नाखूष होतो; सदूभाऊंच्या हट्टामुळें ही धोंड माझ्या गळ्यांत पडली. |
गळ्यापर्यंत येणें | अगदीं असह्य होणें. | |
गळ्याला फास किं० दोरी लागणें | पंचाइतींत, पेंचांत, अडचणींत, असणे, किं० येणें किं० सांपडणें. | |
गळ्यावर गाणें किं० गळ्यावर म्हणणें | मधुर, शास्त्रशुद्ध रीतीनें, किं० चालीवर, गाणें. | उ० श्लोक नीट गळ्यावर म्हण,अशी घाई करूं नको. |
गळ्यावर बोलणें | भरकटल्यासारखें बोलणें; अविचारीपणाचें भाषण करणें. | |
गळ्यावर सुरी ठेवणें | जीव घ्यावयाला सिद्ध होणें. | |
गळ्याशीं येणें | नुकसानीची बाब होणें. | उ० चिंचेचा व्यापार हरिभाऊंच्या गळ्याशीं आला (म्ह० या व्यापारांत ते बुडाले). |
मोठा गळा करून रडणें | मोठमोठ्याने रडणें, ओक्साबोक्शी रडणें. |
%d bloggers like this: