बोट | (क) हाताची किंवा पायाची अंगुलि. | |
(ख) बोटाच्या लांबीचें परिमाण, किं० बोटाच्या रुंदीचें प्रमाण. | ||
(ग) बोटाला लागून येईल तितकें. | उ० तुपाचें बोट, मधाचें बोट, गंधाचें बोट, कुंकवाचें बोट, इ०. | |
बोट करणें, बोट दाखविणें | बोटानें एकाद्या पदार्थाचा निर्देश करणें. | |
बोटें मोडणें | (क) बोटांच्या पेरांचे सांधे सईल करणें. | |
(ख) निर्भर्त्सना करणें; शापणें. | ||
बोट शिरकणें | एकाद्या कामांत प्रवेश मिळणें. | |
बोटावर नाचविणें | आपल्या ताब्यांत ठेवणें; एकाद्या माणसावर ताबा चालविणें. | उ० लक्ष्मणरावाला गोविंदराव बोटावर नाचवितो. |
ज्याचीं बोटें त्याच्या डोळ्यांत घालणें | त्याच्याच युक्तीनें त्याला पकडणें; त्याची हिकमत त्याच्याच विरुद्ध योजणें किंवा लागूं करणें. | |
एकाद्याला दीड बोट, किं० दोन बोटें, स्वर्ग उरणें | तो गर्वानें फुगून जाणें. | उ० अन्नपूर्णाबाईच्या नवऱ्याला मामलतदारी मिळाली तेव्हांपासून तिला दीड बोट स्वर्ग उरला आहे ! |
%d bloggers like this: