एकादा नियम उल्लंघिल्यामुळें निरुपयोणें होणें, फुकट जाणें. आट्यापाट्यांच्या खेळांत खालून वर येणारा गडी पाटीवाल्यापाशीं तोंड मागतो, त्या वेळीं वरचे गडी खालीं जातात. अशा रीतीनें खालून येणारे गडी आणि वरून येणारे गडी यांची एका चौकांत गांठ पडणें, याचें नांव “तोंड मिळणें,” किं० “लोण मिळणें.” अशी गांठ न पडतां, म्हणजे वरचा गडी (असल्यास तो) खालच्या गड्यास न मिळतां खालचा गडी किं० वरचा गडी पुढें जाणें, ह्याला “लोण बारगळणें,” असें म्हणतात. असें झालें म्हणजे तो नियम मोडणारा गडी “बारगळला,” असें म्हणतात. गडी बारगळला म्हणजे तो “मरतो” म्ह० खेळांत निरुपयोगी होतो, व बाहेर पडतो.
"उदा. असा आजपर्यंत कोणी राज्यकर्त्यानें, कि० शास्त्रकारानें, कायदा कानू केलेला आठवत नाहीं, कीं अमुक एका विषयास अमुक अमुकच पृष्ठें लागावीं. ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली कीं लोण बारगळलें !
%d bloggers like this: