टाळी | (क) एका तळहातावर दुसरा तळहात मारणें; ही मारण्याची क्रिया, किंवा तिजपासून झालेला आवाज. | टीप :–अनुरूप क्रियापदः-वाजविंणे, मारणे, पिटणें, वाजणें. उ० टाळ्या पिटोनि जन तेथ सुरम्य घोष- तेव्हां करी; अमित हो सकलांसि तोष । वि० वा० भिडे, रा. प., स. ३, श्लो. ६१. |
(ख) गायनाच्या सुरावर हातावर हात मारणें. | ||
(ग) सट्टा, किं० व्यवहार, ठरल्याची खूण म्हणून दोन व्यापारी एकमेकांच्या हातावर हात मारतात ती टाळी. | ||
ब्रह्मांनंदी टाळी लागणें | सच्चिदानंदस्वरूपांत लय होणें. | उ० ब्रह्मानंद लागली टाळी । तेथें कोण देहातें संभाळी ॥ |
एकदाची टाळी वाजली | एकदाचें लग्न लागलें. (आतां जुळविलेलें लग्न कोणालाही मोडतां, किंवा फिसकटतां, यावयाचें नाहीं !) | |
टाळीस टाळी देणें | खुशामत करणें; वरिष्ठाच्या मूर्खपणाच्या भाषणास अनुमोदन देणें; होस हो म्हणणें. | |
कानावर, किं० कर्णीं, टाळी बसविणें | कानठाळ्या बसविणें; ऐकण्याची शक्ति मोठ्या आवाजानें घालाविणें. | उ० तों गर्जोनि कुरुकटककर्णी बसवी ध्वजस्थ कपि टाळ ॥ मोरोपंत. |
%d bloggers like this: