गाल | मुखाच्या बाजूचे जे दोहींकडील मांसल भाग ते प्रत्येक. | उ० ज्या मुलाच्या गालावर खळग्या आहेत तें मूल मला आवडतें. |
उ० ख्रिस्ती धर्माची अशी आज्ञा आहे कीं कोणी एका गालांत मारिलें असतां दुसरा गाल पुढें करावा. | ||
टीपः-“गाल” ह्या शब्दाने बनलेल्या शब्दसंहतीत ” गालफड ‘ हा शब्द विनोदाने, प्रेमानें, किं० तिरस्काराने, योजण्यांत येतो. | ||
गाल रंगविणें | थोबाडींत मारून एकाद्याचा गाल तांबडा लाल करणें. | |
गालांत बसणें | थोबाडींत बसणें. | टीपः-“बसणें” ह्याचा कर्ता “चपराक ” हा अध्याहृत असतो. |
गाल फुगविणें | बढाई मारणें; शेखी मिरविणें; ऐट करणें. | |
गाल बसणें | रोडावणें. | उ० तापानें त्याचे गाल बसले. |
गालावर गाल चढणें, किं० येणें | सुखासमाधानाच्या राहणीमुळें, किंवा खाणेंपिणे यथास्थित मिळत असल्यामुळें, लठ्ठ होऊन गालाची जाडी वाढणें. | उ० हल्लीं त्याची काय चैन विचारावी ? रोज घृतकुल्या आणि मधुकुल्या चालल्या आहेत ! मग त्याचे गालावर गाल कां नाहीं चढणार ? |
गालांत हसणें, किं० गालांतल्या गालांत हसणें | मंदस्मित करणें. | उ० रुपया दक्षिणा मिळणार हें ऐकून भटजीबोवा गालांतल्या गालांत हसले. |
%d bloggers like this: