काळीज. हृदय. देहातील अत्यंत नाजूक भाग, मर्मस्थान उ० भेदोनि काळिजाला गेला लोकापवादशर इ० मोरोपंत-भारती रामायण. काळीज उडून जाणें, कांपणे, थरथरणें, धडकणें भीतीनें वगैरे छाती उडूं लागणें. त्याच्यापुढें काळीज काढून टाकलें तरी त्याला विश्वास येणार नाहीं कोणत्याही प्रकारांनीं त्याची खात्री पटणार नाहीं. काळीज काढून देणें आपली आवडती वस्तु देणें.
पुढे वाचाCategory: मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी
“कास”
कास (क) गाय, म्हैस, शेळी वगैरेची दुधाची ओटी. (ख) धोतर किंवा लुगडें नेसल्यावर त्याचे सोगे मागें खोवतात ते. (ग) कंबर. उ० गळां तुळसीहार कासें पितांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ कास घालणें एकाद्या कामासाठीं सर्व सामुग्री जुळवून तयार होऊन राहणें. एकादी गोष्ट करावयास उत्सुकतेनें सिद्ध
पुढे वाचा“कान”
कान (क) प्राण्याचें श्रवणेंद्रिय. (ख) मोदकपात्र, कढई, वगैरे भांडी धरावयासाठीं, किं० उचलावयासाठीं केलेली. जीं साधनें तीं प्रत्येक. (ग) कानाच्या पाळींत वगैरे दागिना अडकविण्यासाठी पाडलेलें भोक. उ० तुमच्या गजाननाचा भिकबाळीचा कान बुजला आहे. (घ) बंदुकीला बत्ती लावावयाची जागा. (ह्या अर्थाने ‘काना’ हा शब्द अधिक प्रचलित आहे).
पुढे वाचा“कपाळ”
कपाळ (क) भिवयांच्या वरचा व मस्तकाच्या खालचा जो प्रदेश तो. (ख) नशीब, दैव, पूर्वकर्माचा परिपाक. उ० पुत्राचे सुख माझ्या कपाळीं नाहीं. कपाळ उठणें कि० चढणें त्रास, पीडा, किं०उपद्रव होणें. कपाळ काढणें वैभवास चढणें. उ० ह्या मुलाच्या विद्येला पैसा खर्च करावयास तुम्ही कचरूं नका. तो चांगलें कपाळ काढील,
पुढे वाचा“कंठ”
कंठ. (क) गळा; छातीच्या वरचा आणि हनुवटीच्या खालचा भाग; डोकें आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग उ० सर्वांगीं सुंदर उटि शेंदुराची । कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥ रामदास. (ख) घसा. उ० दुःखामुळें त्याच्या कंठांतून शब्द निघेना. (ग) आवाजी (गायनांत); उच्चाराचा प्रकार, उ० त्या स्त्रीचा कंठ मधुर आहे.
पुढे वाचा“ओठ”
ओठ मुखाच्या वरचा आणि खालचा असे जे दोन अवयय, ते प्रत्येक ओठ फुटणें थंडीमुळे ओठाला चिरा किंवा भेगा पडणें. ओठाचा जार वाळणें जार म्ह० मूल जन्मतांच त्याच्या ओठावर, गालावर, वगैरे जो चिकटा, किं० बुळबुळीत पदार्थ असतो तो. अर्भकदशा समाप्त होऊन मोठें होणें उ० अझून तुझ्या ओठावरचा
पुढे वाचा“ओटी”
ओटी (क) बेंबीच्या खालची व कंबरेच्या वरचा पोटाचा भाग. (ख) लुगडे किं० धोतर नेसल्यावर त्याचा जो खोळीसारखा भाग होतो तो. उ० त्या मुलीनें आंब्याच्या झाडाखालीं पडलेल्या साऱ्या कैऱ्या आपल्या ओटींत भरल्या. (ग) मंगलप्रसंगी तांदूळ, गहूं, हळकुंडें, वगैरे पदार्थ स्त्रीच्या ओटींत घालतात ते. ओटी भरणें (क)
पुढे वाचा“ऊर”
ऊर छाती, वक्षःस्थळ. ऊर काढून चालणें ऐटीनें किं० बेपर्वाईनें चालणें किं० वागणें. ऊर दडपणें (भीतीनें, आश्चर्यानें, वगैरे) स्तब्ध किं० ग्रस्त होणें. ऊर दबणें, ऊर बसणें, ऊर फाटणें, ऊर उलटणें आश्चर्यचकित होणें; भीतिग्रस्त होणें; घाबरणें; गांगरणें. ऊर दाटणें किं० ऊर भरणें (क) छातींत बांध बसणें.
पुढे वाचा