दंड. | खांद्यापासून कोपरापर्यंत बाहूचा किंवा भुजाचा भाग. | |
दंडाला काढण्या लावणें किंवा बांधणें | कैद्याच्या दंडाला दोरी बांधणें, (त्याला पकडून नेत असतां). | |
दंड थोपटणें | एका हाताचा दंड दुसऱ्या हातानें ठोकणें (कुस्तीला उभे राहतांना). | |
दंड थोपटून उभें राहणें किंवा ठाकणें | (क) युद्धाची तयारी करून उभें रहाणें. | |
(ख) वाग्युद्धास तयार होणें. | ||
दंडाला माती लावणें | कुस्ती खेळावयाचे वेळीं दंडाला माती लावून कुस्तीला तयार होणें. | उ० मी तर केव्हांच दंडाला माती लावून उभा आहे, तुझ्याचकडून उशीर होता! चल, ये आतां कुस्तीला! |
दंड धरून आणणें किंवा दंड खेचून आणणें | एकाद्याची यावयाची इच्छा नसतां त्याला जबरदस्तीनें आणणें. | |
दंड फुरफुरणें | मारामारीची, कुस्तीची, वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. | |
दंड भरणें | तालीम वगैरेंच्या योगानें दंड बळकट व जाडी होणें. | उ० तुम्ही रोज जोडी करून दुधाचा खुराक चालवा, म्हणजे तुमचे दंड भरतील. (येथें “भरणें” हे अकर्मक क्रियापद आहे). |
दंड दरदरून फुगणें | आपल्यापाशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. | |
दंडास दंड लावून किंवा घासून | बरोबरीच्या नात्यानें; सारख्या संमानानें. | |
दंडाला बिरीद किंवा बिरुद बांधणें | एकाद्या कलेंत किंवा कौशल्यांत आपण पटाईत आहों, हें दाखविण्यासाठीं दंडाला दोरा बांधण्याची चाल आहे. यावरून “दंडाला बिरुद बांधणें,” म्ह० एकाद्या गोष्टीच्या अभिवृद्ध्यर्थ, किं० पुरस्कारार्थ, आपण तयार आहों, असें जाहीर करणें. एकादी गोष्ट आपण करूंच करूं, अशी प्रतिज्ञा भोगणें. | उ० गेल्या दशकांत लोककल्याणकर्ती मंडळीही आर्यजननीचें बिरीद दंडाला बांधून जिकडे पहावें तिकडे कंबरा बांधून उठली, व पटापट देशहिताच्या कामाला लागली. निबंधमाला,–विष्णुशास्त्री चिपळुणकर. |
%d bloggers like this: